उद्धवराव ही ‘ नाईटलाईफ नसून किलिंगलाईफ’ आहे : आशिष शेलार

टीम महाराष्ट्र देशा: उद्धव ठाकरे यांच्या सरकारने मान्यता दिलेली ही ‘नाइटलाइफ नसून किलिंगलाइफ’आहे. मुंबईतील कमला मिल येथे आग लागली होती. त्यामध्ये १४ जणांचा मृत्यू झाला. मुंबईच्या नाइटलाइफला रक्तरंजित इतिहास आहे, हे निर्णय घेणाऱ्यांना माहिती नाही का?असा सवाल करत आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे सरकारच्या ‘नाइट लाइफ’च्या निर्णयावर घणाघाती टीका केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या नाइटलाइफच्या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे येत्या २७ तारखेपासून मुंबईत नाइटलाइफ प्रत्यक्षात लागू होणार आहे.

मात्र, राज्य सरकारच्या या नाइट लाइफच्या निर्णयाला भाजपाने विरोध दर्शविला आहे. नाइटलाइफ नाही तर किलिंग लाइफ असल्याचे सांगत भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी राज्य सरकारवर तुफान हल्लाबोल केला आहे.

मोठ्या भ्रष्टाचाराची सुरूवात नाइटलाइफच्या माध्यमातून होईल.भ्रष्टाचार पाठीशी घालण्यासाठी नाइट लाइफचा निर्णय घेऊन टुरिझमच्या नावाखाली पडदा टाकण्याचे काम सत्ताधारी महापालिका आणि सरकार करत आहे, असा घणाघाती आरोप आशिष शेलार यांनी केला आहे.