‘उद्धवजी, विचार करा! आजही अडीच अडीच वर्षाचे मुख्यमंत्रिपद होऊ शकतं’, आठवलेंचे आवाहन

नागपूर : महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्षाचे नेते वारंवार हे सरकार पडणार अशा वल्गणा करत आहेत. मात्र, अनेकदा वाद, मतभेद होऊनही सध्या तरी तीन पक्षांचे स्थिर दिसत आहे. मात्र, भाजपच्या मित्रपक्ष असलेल्या रिपाईंच्या रामदास आठवलेंना उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत नको वाटत आहेत. त्यामुळे ते वारंवार उद्धव ठाकरेंना भाजपसोबत परत एकदा सरकार स्थापन करण्याचा सल्ला देत आहेत. आज नागपुरात त्यांनी परत एकदा हा मुद्दा छेडला आहे.

नागपुरात बोलताना ते म्हणाले की, अजूनही काही बिघडलेले नाही. अडीच अडीच वर्षाचे मुख्यमंत्रीपद आजही होऊ शकतं. आमची इच्छा आहे. यासंदर्भात उद्धव ठाकरेंनी विचार करावा. हे फडणवीसांना मान्य आहे, असंही आठवलेंनी सांगितले.

यावेळी त्यांनी अजित पवारांनाही टोला लगावला. ‘अजित पवार म्हणतात की कोण लाल आहे जो हे सरकार पाडून दाखवेल, तर मी म्हणतो तो लाल अजित पवारच आहेत’, अशी कोपरळी आठवलेंनी मारली.

उद्धव ठाकरेंनी बॅक टू पव्हेलियन यावे
उद्धव ठाकरेंना माझा प्रस्ताव आहे. त्यांनी बॅक टू पव्हेलियन यावं. भाजपसोबत सरकार स्थापन करावं. शिवसेना, भाजप आणि आरपीआयची युती महाराष्ट्राला विकासाच्या दिशेने नेणारी आहे. शिवसेना आणि भाजपची 30 वर्षांपासूनची मैत्री होती. उद्धव ठाकरे यांनी या मैत्रीचा विचार करावा. भाजपसोबत यावं आणि मोठ्या मनाने देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करावं, असं आवाहनही आठवले यांनी तीन दिवसांपूर्वी केलं होतं.

महत्वाच्या बातम्या

IMP