भाजपच्या धास्तीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतले ; सरकारमधील दोन नेत्यांचे राजीनामे

टीम महाराष्ट्र देशा : विरोधी पक्ष असणाऱ्या भाजपकडून शिवेसेनेने मंत्रीपदाचा दर्जा देऊ केलेल्या मंत्र्यांवर ‘ऑफिस ऑफ प्रॉफिटनुसार’ आक्षेप घेण्याची तयारी केली होती. मात्र त्यापूर्वीच शिवसेनेने दोन्ही मंत्र्यांचे राजीनामे घेऊन ठेवले आहेत.अशी बातमी टी.व्ही.९ या वृत्तवाहिनीने दिली आहे.

मात्र रवींद्र वायकर आणि अरविंद सावंत यांच्याकडून मात्र अशा कुठल्याही घटनेचा इन्कार करण्यात आला आहे. वायकर यांची ११ फेब्रुवारीला मुख्यमंत्री सचिवालयात प्रमुख समन्वयक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तर १४ फेब्रुवारीला अरविंद सावंत यांची महाराष्ट्र राज्य संसदीय समन्वय समितीच्या अध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

Loading...

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या.महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेनंतर सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेनेनं मंत्रिपदाचा दर्जा असलेल्या दोन मंत्र्यांचे राजीनामे घेतल्याची माहिती,समोर येते आहे.रवींद्र वायकर आणि अरविंद सावंत या दोघांचेही राजीनामे घेतल्याची माहिती आहे. महत्त्वाचं म्हणजे भाजपकडून आक्षेप घेण्याची कुणकुण लागल्याने शिवसेनेने सावध पवित्रा घेतल्याचं सांगण्यात येत आहे.

राज्य शासनाने अध्यादेश काढून ही नियुक्ती केली आहे. अध्यादेशात रवींद्र वायकर आणि अरविंद सावंत यांना देण्यात येणारे वेतन, भत्ते आणि सुविधा यांचा उल्लेख वादाचे कारण बनलं आहे. “ऑफिस ऑफ प्रॉफिट” या नियमानुसार भाजपाकडून आक्षेप घेतला जाण्याची वा न्यायालयात धाव घेण्याची कुणकुण लागताच शिवसेनेचा सावध पवित्रा आहे.

वायकर आणि सावंत यांनी अजून पदभार स्वीकारलेला नाही. पण त्यांच्या पदांवर आक्षेप घेत वाद निर्माण झाल्यास राजीनाम्याची नामुष्की ओढवण्याची स्थिती निर्माण झाली, तर सावध उपाययोजना म्हणून दोघांकडून बॅक डेटेड राजीनामे घेतले गेल्याची जोरदार चर्चा आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
...त्यामुळे भारताला कोरोनापासून अमेरिके इतका धोका नाही, या तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले मत
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात वाढला कोरोनाग्रस्तांचा झपाट्याने आकडा, सात महिन्यांच्या बाळाचाही समावेश
'धन्यवाद अजित पवार! शेवटी अनुभवाचं महत्व तुम्ही दाखवून दिलं; बाकीचे फेसबुक लाईव्हमध्ये व्यस्त'
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
#मरकज : मशीद खाली करण्यास मौलानांनी दिला नकार,  अजित डोवालांना उतरावं लागल मैदानात
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका