अशावेळी निवडणुकांचा विचारचं कसा येतो ? उद्धव यांचा राज ठाकरेंना टोला

raj-,-uddhav-thackeray-

टीम महाराष्ट्र देशा : गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात सध्या पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पुरामध्ये अनेकांच्या घरात पाणी घुसले आहे. त्यामुळे संसार उध्वस्त झालेले आहेत. तसेच अनेक लोक अद्यापही पुरात अडकलेले आहेत. पुरात अडकलेल्या लोकांच्या सुटकेसाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

शनिवारी राज ठाकरे यांनी पूरस्थितीवर भाष्य करताना ‘सध्या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदतीची गरज आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत विधानसभा निवडणूक न घेता ती पुढे ढकला आणि कोल्हापूर, सांगलीतील परिस्थितीवर लक्ष केंद्रीत करा असं विधान केले होते. त्यांच्या या विधानाला उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

Loading...

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबईत पत्रकार परिषद पार पडली यावेळी त्यांनी मनसेचे नेते राज ठाकरे यांच्यावर टीका केली. त्यांनी हे संकट एवढं भीषण आहे की, निवडणुकांचा विषयच कुणाच्या डोक्यात कसा येऊ शकतो हेच मला कळत नाही अशा शब्दात राज ठाकरेंना टोला लगावला. सांगली आणि कोल्हापूरमधली पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर जाऊन मला जनतेला कोरडी सहानुभूती दाखवायची नव्हती. त्यामुळे मी या भागाचा दौरा केला नाही असंही स्पष्ट केले.

दरम्यान कॉंग्रेसचे नेते रणजित देशमुख यांनीही राज ठाकरे यांच्याप्रमाणे ‘पूरग्रस्तांचे तातडीने पुनर्वसन करण्याची गरज आहे. विधानसभा निवडणुका व पुनर्वसन एकाचवेळी शक्य नाही त्यामुळे निवडणुका एक वर्षांसाठी पुढे ढकला. आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा’ असं विधान केले आहे.

महत्वाच्या बातम्या – 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कोरोना व्हायरस संदर्भात भारतीय शास्त्रज्ञांना मोठं यश
परभणीच्या 'त्या' शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्र्यांनाच केला एसएमएस, त्यांनतर जे घडले...
भारताचा 'हा' स्टार गोलंदाज पोलिसी वर्दीत करतोय कोरोनाबाबत जनजागृती
आनंदवार्ता : पुण्यात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या वाढली, डॉक्टरांवर होतोय कौतुकाचा वर्षाव
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
अभिनेते ऋषी कपूर यांची मागणी, 'संध्याकाळपुरते तरी दारुची दुकानं उघडा...'
माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं
देशातील 10 बँकांचे होणार विलीनीकरण, १ एप्रिलपासून प्रक्रियेला होणार सुरवात
फैसला ऑन दि स्पॉट , संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दादांनी दिला दिलासा
एकही केस नसणाऱ्या आदित्य ठाकरेंना झेड दर्जाची सुरक्षा कशाला ? : निलेश राणे