‘मी चौकीदार नाही’ असं म्हणत उद्धव ठाकरेंनी चौकीदाराकडे फिरवली पाठ

udhav thackeray and pm narendra modi

टीम महाराष्ट्र देशा – सामना वृत्तपत्राचे संपादक संजय राऊत यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. त्यावेळी उद्धव यांनी आपण कॉंग्रेस मुक्त भारत या अभियानासाठी काम करत नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच ‘मै भी चौकीदार’ या सोशल मिडीयावर चालत असलेल्या मोहिमेवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मी चौकीदार नसून जन्मत:च शिवसैनिक” असे एका वाक्यात उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक सभेत काँग्रेसमुक्त भारताची घोषणा देत असतात. परंतु, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी यापासून फारकत घेतली आहे.उद्धव ठाकरे यांनी आपण कॉंग्रेस मुक्त भारताच्या बाजूने नसल्याचे या मुलाखतीत स्पष्ट केले आहे. तसेच “ मी जन्मतः शिवसैनिक, मला चौकीदार होण्याची गरज नाही “, अशी उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

विरोधी पक्षात सर्वांनाच पंतप्रधान होण्याची ईच्छा आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणखी पाच वर्षे द्यायला आम्ही तयार आहोत असेही उद्धव ठाकरे यांनी या मुलाखतीत सांगितले. तसेच जेवढ्या जागा माझ्या वाट्याला आल्या तेवढीच शिवसेना मला सीमीत ठेवायची नाही अशा अनेक मुद्द्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिले