काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पोटातल्या कळा गर्भारपणाच्या नसून वांझोटेपणाच्या – उद्धव ठाकरे

udhav thackeray

टीम महाराष्ट्र देशा – भाजपध्यक्ष अमित शाह यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उद्धव ठाकरे गुजरातमधील गांधीनगर येथे दाखल झाले होते. यावेळी त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करून महायुतीची ताकद दाखवण्याचा जोरदार प्रयत्न केला.

उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांच्या भेटीनंतर विरोधीपक्षांकडून शिवसेनेवर जोरदार टीका करण्यात आल्या. या टीकांना प्रतिउत्तर उद्धव ठाकरेंनी आजच्या सामना अग्रलेखातून दिले आहे. त्यांनी आजच्या सामना अग्रलेखातून कॉंग्रेस – राष्ट्रवादी या आघाडीवर चांगलेच तोंडसुख घेतेले आहे.

आमच्या भेटीमुळे काँग्रेस-राष्ट्रवादी कोल्हय़ांच्या पोटात दुखू लागले आहे. या कळा गर्भारपणाच्या नसून वांझोटेपणाच्या आहेत. अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी आघाडी पक्षांवर टीका केली आहे.

नक्की काय म्हणाले उद्धव ठाकरे ?

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या खास निमंत्रणावरून आम्ही गांधीनगरात गेलो. त्यांचा उमेदवारी अर्ज भरायचा हे एक निमित्त होते, पण त्यानिमित्त राष्ट्रीय लोकशाही आघाडीची ‘वज्रमूठ’ दाखवणे हा मुख्य हेतू होता. त्याचा परिणाम असा झाला की, काँग्रेस-राष्ट्रवादी कोल्हय़ांच्या पोटात दुखू लागले आहे. या कळा गर्भारपणाच्या नसून वांझोटेपणाच्या आहेत. कळा इतक्या पराकोटीच्या आहेत की, जनता त्यांच्यावर लवकरच शस्त्रक्रिया केल्याशिवाय राहणार नाही. आमचे व्यवस्थित जुळले व सर्व कटुता विसरून आम्ही महाराष्ट्र व देशहितासाठी एकत्र आलो. त्यामुळे काहींना जी पोटदुखी लागली आहे त्यावर सध्या तरी उपचार नाहीत.

Loading...

दरम्यान, सध्या राज्यसभेचे खासदार असलेले अमित शहा यंदा पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्याआधी त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं.