fbpx

शिवसेनेचा लोकसभेचा अधिकृत पहिला उमेदवार जाहीर

टीम महाराष्ट्र देशा- शिवसेनेने स्वबळावर निवडणुका लढण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकलं आहे.  शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी शिर्डी येथे झालेल्या मेळाव्यात विद्यमान खासदार सदाशिवराव लोखंडे यांची लोकसभेच्या निवडणुकीसाठी आज उमेदवारी जाहीर केली. आगामी निवडणुकीसाठी लोखंडे हे शिवसेनेचे पहिले अधिकृत उमेदवार ठरले आहेत.

राज्यव्यापी दौऱ्याची सुरवात ठाकरे यांनी शिर्डीपासून केली. साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन त्यांनी राजकीय मोहिमेचा श्रीगणेशा केला. दरम्यान,लाचारी माझ्या रक्तात नाही, स्वाभिमानानेच जगू, मला वडिलांनी लाचारी शिकवलीच नाही, असं वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. खोटं बोल, पण रेटून बोल, या पद्धतीने सध्या कारभार सुरु आहे, अशी टीकाही त्यांनी भाजप सरकारवर यावेळी केली.

सत्ताप्राप्तीसाठी शिवसेनेला सोबत घ्या,फडणवीसांची पक्षश्रेष्ठींना कळकळीची विनंती