माझ्या वक्तव्याचा विपर्यास; महाआघाडीत सहभागी होणार नाही – उद्धव ठाकरे

udhav thakre

मुंबई : विधानसभा निवडणूक जवळ येऊन ठेपली असून, या निवडणुकीत युती करण्यासाठी भाजपकडून शिवसेनेची मनधरणी करण्याचे काम चालू आहे. तर दुसरीकडे येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी सर्व विरोधी पक्ष भाजप विरोधात एकवटले असून, ते महाआघाडी करण्याच्या तयारीत आहेत .

ते शिवसेनेला देखील आपल्यासोबत घेण्यासाठी प्रयत्न करत असून, त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन सोहळ्यात शरद पवारांनी शिवसेनेला सोबत घेण्याचं सूचक वक्तव्य केलंत. दरम्यान याबाबत उद्धव ठाकरे यांना विचारले असता सर्वांच्या ऑफर आल्यावर निर्णय घेऊ असं त्यांनी म्हंटलं होतं.

Loading...

मात्र आता त्यांनी आपल्या वक्तव्यावरून युटर्न घेत,माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला असून,आपण कदापिही महाआघाडीत सहभागी होणार नसल्याचं त्यांनी म्हंटलं आहे. सहज गमतीने केलेल्या वक्तव्याचा विपर्यास झाल्याचं म्हणत उद्धव ठाकरेंनी महाआघाडीत सामील होण्याचा कोणताही विचार नसल्याचं म्हटलं आहे. शिवसेनेची पक्षांतर्गत भेट रंगशारदा सभागृहात आयोजित कऱण्यात आली होती. त्यावेळी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना नंतर बघू नाही तर नंतर बोलू असं म्हटल्याचं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
अरे तुम्ही काय संरक्षण काढता, पवारांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रातील पैलवान सरसावले
'उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री; महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे'
राष्ट्रवादीची गुंडगिरी : भाजपने केला सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल
दोस्ती तुटायची नाय : शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पालिकेत भाजपचा महापौर
राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात...
करोना आजार होऊ नये याकरिता दक्षता घेण्याबाबत पुणे मनपाचे आवाहन
जातीवाद रोखण्यासाठी शरद पवार मैदानात; सरकार उचलणार 'हे' पाऊल
सलमान अजूनही कतरीनाच्या प्रेमात स्वत:च दिली कबुली