राजकारण करायचं असल्यास डोकी वापरा, दैवतांच्या पगड्या वापरु नका : उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरेंचा शरद पवारांवर निशाणा

टीम महाराष्ट्र देशा- पुण्यातील कार्यक्रमात पेशवेकालीन पगडीने स्वागताची परंपरा आहे. मात्र शरद पवारांनी त्याला फाटा देत, यापुढे राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात फुले पगडीनेच स्वागत करावे असं म्हंटलं होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत असून शरद पवार यांच्यावर टीका देखील केली जात आहे.आता याच मुद्द्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पवारांवर निशाणा साधला आहे.राजकारण करायचं असल्यास डोकी वापरा, दैवतांच्या पगड्या वापरु नका असं म्हणत ठाकरे यांनी पवार यांच्यावर टीका केली आहे.

पगड्यांमधून तुम्ही राजकारण करीत आहात, मराठी माणूस तुम्हाला गाडून टाकल्याशिवाय राहणार नाही.राजकारण करायचं असल्यास डोकी वापरा, दैवतांच्या पगड्या वापरु नका. पगड्यांमुळे लोक प्रसिद्ध झाले नाहीत तर त्या लोकांमुळे पगड्या प्रसिद्ध झाल्या.लोकमान्य टिळक, महात्मा फुले ही महाराष्ट्राने दिलेली रत्न आहेत असं देखील ते म्हणाले.

पुण्यातील कार्यक्रमात पेशवेकालीन पगडीने स्वागताची परंपरा आहे. मात्र शरद पवारांनी त्याला फाटा देत, यापुढे राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात फुले पगडीनेच स्वागत करावे असं म्हंटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यातील वर्धापन दिनानिमीत्त आयोजित मेळाव्यात पगड्यांची जोरदार चर्चा रंगली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यापुढे राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात पेशवेकालीन पगडी नाही तर फुले पगडीनेच स्वागत करायचं, असा आदेश दिला आहे. दरम्यान शरद पवारांनी छगन भुजबळांचा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पगडीने सत्कार करून याची सुरुवात केली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला शरद पवार यांचे स्वागत पुणेरी पगडीनेच झाले. त्यानंतर उशिरा मंचावर आलेल्या भुजबळांचे स्वागतही पुणेरी पगडीने झाले. मात्र, भुजबळांच्या भाषणानंतर जेव्हा शरद पवार भाषणासाठी उभे राहिले, तेव्हा त्यांनी महात्मा फुलेंच्या पगडीने त्यांचा सत्कार केला. शिवाय राष्ट्रवादीच्या यापुढच्या सभा आणि मेळाव्यांमध्ये याच पगडीचा वापर करण्याचा सल्लाही शरद पवार यांनी आयोजकांना दिला.

You might also like
Comments
Loading...