fbpx

शेतकऱ्यांना मदत मिळतेय की नाही याची शहानिशा करा, शिवसेनेच्या मंत्र्यांना तंबी 

udhhav thakarey
मुंबई– राजभर दुष्काळाच्या झळा आता पहायला मिळत आहेत. दुष्काळग्रस्त  भागांचा दौरा करून तेथील शेतकऱ्यांची भेट घ्या आणि त्यांच्या समस्या जाणून घ्या. आपापल्या भागात जाऊन प्रत्येक शेतकऱयाची गाठ घ्या. त्या शेतकऱ्यांना सरकारची मदत मिळतेय की नाही याची शहानिशा करा. असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांना दिले.
कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या आणि नापिकीला कंटाळलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शेतकऱ्यांना मदत, पाण्याविना होरपळून निघालेला विदर्भ आणि मराठवाडा अशा विविध प्रश्नांबाबत उद्धव ठाकरे यांनी आज सोमवारी मातोश्री निवासस्थानी सर्व मंत्र्यांची बैठक बोलावली होती. यावेळी दुष्काळाशी संबंधित विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली. बैठकीनंतर शिवसेना नेते, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीत झालेल्या चर्चेबाबतची माहिती पत्रकारांना दिली.
https://maharashtradesha.com/alliance-can-be-made-on-hindutva-issues-joshi/