fbpx

उध्दव ठाकरे यांचा पंढरपुर दौरा बेरजेचा की वजाबाकीचा ?

टीम महाराष्ट्र देशा – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुढच्या आठवड्यात पंढरपूर दौऱ्यावर येत आहेत. शिवसेना नेते तानाजीराव सावंत यांनी सोलापुर आणि उस्मानाबाद जिल्हयाचे संपर्क प्रमुख म्हणुन सुत्रे हाती घेतल्यापासुन संघटनात्मक फेरबदलाचा सपाटा लावला आहे. त्यात जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख सर्वच पदे बदलुन नवीन टीम निवडणुकांच्या तोंडावर सज्ज केली आहे, त्यातले बरेच पदाधिकारी, प्रमुख मतदार संघामध्ये परिचीत नसलेले चेहरे आहेत. परंतु ते संपर्क प्रमुखाच्या खास मर्जीतले आहेत. अशी चर्चा कार्यकर्त्यांच्यामध्ये चालू आहे. त्यामुळे फेरबदलाचे परिणाम सकारात्मक होतील की नकारात्मक होतील हे येणारा काळ ठरवेल.

आरोग्य मंत्री डॉ. दिपक सावंत यांचा कार्यकाल जानेवारी मध्ये संपतोय. त्याजागी तानाजी सावंत मंत्री होणार आहेत, अशी चर्चा सध्या चालू आहे. म्हणुन त्यांच्या मंत्रिपदासाठी दोन्ही जिल्ह्यातुन प्रत्येक नवीन पदाधिकाऱ्यांकडून जिल्हा प्रमुखांनी समर्थन पत्रे घेतली आहेत. परिणामी दोन जिल्हे आपल्या पाठीमागे आहेत, हे दाखवण्याचा प्रयत्न सावंत यांच्याकडून चालला आहे. असंही बोलले जात आहे.

फेरबदलाच्या निवडीमुळे मात्र पक्षात प्रचंड नाराजी धुमसत आहे. यामध्ये उस्मानाबादचे खासदार रविंद्र गायकवाड, परंडाचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, उद्योगपती शंकर बोरकर सोलापुरचे पुरुषोत्तम बरडे, अकलुजचे धवलसिंह मोहिते पाटील, कुर्डुवाडीचे धनंजय डिकोळे, माळशिरसचे नामदेव वाघमारे असे अनेक राजकीय दिग्गज ज्यांनी साखर पट्टयातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत शिवसेनेसाठी दोन हात केले असे सर्व निष्ठावंत त्रासले आहेत. त्यामुळे पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंनी यात लक्ष घालावे अशी मागणी सामान्य शिवसैनिकांकडून केली जातेय. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा पंढरपूर दौरा नक्की कोणत्या मुद्द्यांनी गाजणार हे पाहणं महत्वाच ठरणार आहे .

करमाळ्यात नारायण पाटील-जयवंतराव जगताप यांचे मनोमिलनाचे संकेत?