रंग बदलण्याबाबतचा टोमणा मुख्यमंत्र्यांनी नेमका कुणाला मारला ?

उद्धव ठाकरे

सातारा : मल्हारपेठ (ता. पाटण) येथील पोलिस ठाण्याची इमारत व पोलिस निवासस्थानाचे ई-भूमिपूजन आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई आदींची उपस्थिती हाेती.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इमारतीचा रंग बदलण्याची सूचना प्रशासनास केली. त्याचा धागा पकडत मुख्यमंत्री ठाकरे यांनी केलेल्या एका विधानाची चांगलीच चर्चा होताना दिसत आहे.ठाकरे यावेळी म्हणाले मला बरं वाटल. मला वाटले मी एकटाच कलाकार आहे. हल्ली मी माझी कला, फाेटाग्राफी बासनात गुंडाळून ठेवले आहे. जे समाेर येत आहे ते पाहत असताे. अनेक जण अनेक रंग दाखवत आहे. हे रंग बघावे लागतात. पण रंग बदलण्याचे धाडस असावे लागते. ते धाडस सुद्धा या सरकारमध्ये आहे. नुसते लाेक रंग दाखवित आहेत. ते रंग बघताेय आपण त्याला काय अर्थ नाही. ते बदलण्याचे धाडस देखील या सरकारमध्ये आहे हे सुद्धा मनातून बाहेर आलेले आहे अशी टिप्पणी देखील मुख्यमंत्री ठाकरेंनी केली.

दरम्यान,मुख्यमंत्र्यांनी नेमका हा टोला कुणाला लगावला याबाबत उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी हा टोला भाजपला लगावला,राष्ट्रवादीला लगावला, स्वबळाची भाषा करणाऱ्या कॉंग्रेसला लगावला याबाबत मतमतांतरे आहेत. महाविकास आघाडीत सध्या धुसफूस सुरु असून महाविकास आघाडीत प्रमुख पक्ष असणाऱ्या कॉंग्रेसने स्वबळाची भाषा करत रंग बदलल्याने वर्धापनदिनी आपल्या भाषणातून मुख्यमंत्र्यांनी कॉंग्रेसला खडेबोल सुनावले होते. ठाकरे यांनी आपल्या भाषणातून फटकारल्यानंतर देखील नाना पटोले यांनी आपल्या स्वबळावर लढण्याच्या निर्णयाचं समर्थन केलं होतं. यामुळेच काँग्रेसच्या स्वबळाच्या नाऱ्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी आणि खुद्द मुख्यमंत्री नाराज आहेत अशी परिस्थिती आहे.पदोन्नती आरक्षण,ओबीसी आरक्षण या मुद्द्यांच्या बाबत देखील कॉंग्रेसनेते आक्रमक झाले आहेत. त्यामुळे हा टोला कॉंग्रेसला लगावला असल्याचे काहींचे म्हणणे आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे दिल्ली दौऱ्यावर होते यावेळी देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल अशी बैठक त्यांनी घेतली. कॉंग्रेसच्या सोबत असणारे पवार तिसरी आघाडी करून आपले रंग तर दाखवणार नाहीत ना अशी चर्चा सुरु आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी हा टोला राष्ट्रवादीला तर लगावला नाही ना ? असा देखील सवाल उपस्थित करायला वाव आहे.

भाजपबाबत बोलायचे झाल्यास शिवसेना भाजपची २५ वर्षांपासूनची युती तुटल्यानंतर भाजपने देखील रंग बदलले. अजित पवारांसह देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापन करून भाजपने आपले रंग दाखवले. वेगवेगळ्या मुद्द्यांवरून शिवसेनेला खिंडीत पकडण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. एकेकाळी मांडीला मांडी लावून सत्तेचा उपभोग घेणाऱ्या शिवसेनेबाबत भाजपने घेतलेली कठोर भूमिका हा धागा पकडून देखील मुख्यमंत्र्यांनी टीका केली असण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या

IMP