fbpx

पालघर पोट निवडणुकीतील पराभव विसरू शकणार नाही – उद्धव ठाकरे

udhav thakre

पालघर : भाजप आणि शिवसेना हे दोघेही सत्ताधारी पक्ष असले तरी देखील आतापर्यंत दोघेही कायमच परस्परविरोधी भूमिका घेत असल्याचं पाहायला मिळतंय. आणि आता नुकत्याच झालेल्या पालघर पोटनिवडणुकीमुळे त्यांचे संबंध आणखी ताणले गेल्याचं चित्र आहे. दरम्यान पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी पालघर निवडणुकीवरून भाजपवर निशाणा साधलाय. पालघर पोट निवडणूक साम दाम दंड भेद यांच्या विरुध्द अशीच झाली. त्यामुळे ही निवडणूक आपण कधीही विसरू शकणार नसल्याचं त्यांनी म्हंटलं आहे.

ते पालघर जिल्ह्यातील तलासरी इथं आभार सभेत बोलतं होते. उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, पालघर निवडणुकीतील पराभव मी खिळाडू वृत्तीने आणि कोणत्याच परीने मान्य करायला तयार नाही. उन्हामुळे जर यंत्र बंद पडतील मग चाचण्या कसल्या घेतल्या. नाव गायब, बोगस मतदान, यंत्र बिघडली याला लोकशाही म्हणतात का? असा खडा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

तसेच भाजपसोबत युती करण्याचा प्रश्नच येत नाही. शिवसेना सर्व जागा स्वबळावर लढवणार असून, श्रीनिवास वनगा हेच शिवसेनेचे पालघर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार असणार आहेत असं देखील त्यांनी म्हंटलं आहे.

3 Comments

Click here to post a comment