भाजपशी युती नाहीच; उद्धव ठाकरे यांची स्वबळावर निवडणुका लढवण्याची घोषणा

पालघर : विधानसभा आणि लोकसभा निवडणुका जवळ येऊन ठेपल्या आहेत. भाजपसह सर्वच पक्ष निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. याचाच एक भाग म्हणून युतीसाठी भाजपकडून शिवसेनेला गोंजारण्याचे काम सुरु आहे.

bagdure

दोन दिवसांपूर्वीच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. मात्र आता ही भेट व्यर्थ ठरल्याचं चित्र आहे. भाजपसोबत शिवसेना कदापिही युती करणार नसून, शिवसेना आगामी सर्व निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ते पालघरमध्ये बोलत होते.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, पालघर पोट निवडणूक साम दाम दंड भेद यांच्या विरुध्द अशीच झाली. आपण त्यांना घाम फोडला. येणाऱ्या काळात शिवसेना भाजपसोबत युती करणार नाही. तसेच पालघर लोकसभा मतदारसंघातून येणाऱ्या लोकसभेला श्रीनिवास वनगा हेच शिवसेनेचे उमेदवार असतील अशी घोषणा देखील त्यांनी यावेळी केली.

You might also like
Comments
Loading...