महापौर विश्वनाथ महाडेश्वरांंनंतर उद्धव ठाकरेंचा अजब दावा ; ‘यंदा मुंबईत पाणी तुंबलंच नाही!’

udhav thakare

मुंबई: काल रात्रीपासून मुंबईत सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे सकाळी ठीक-ठिकाणी पाण्याचे साम्राज्य साचले आहे. यामुळे मुंबईकरांचे जनजीवन विस्कळीत झालं असताना मुंबई महानगर पालिकेचे महापौर विश्वानाथ महाडेश्वर यांनी मात्र मुंबईत कुठेच पाणी साचले नाही असा अजब दावा केला. एवढ्यावरच न थांबता महाडेश्वरांनी मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना चांगले काम केल्याचे प्रमाणपत्र देखील दिले आहे.

उद्धव ठाकरे यांनी पावसाच्या पार्श्वभूमीवर महापालिका मुख्यालयाच्या आपत्कालीन विभागाबरोबर चर्चा केली. मुंबईच्या पावसावर प्रतिक्रिया देताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हटले कि,‘गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाणी कमी तुंबलं आहे. भूभाग समुद्रसपाटीपासून खाली असल्यामुळे काही वेळ पाणी साचत असतच’ असेही उद्धव बोलले.

‘मुंबईत कुठेही पाणी तुंबल नाही. काही दुर्घटना घडल्या पण त्यामध्ये जिवीतहानी झाली नाही हे सुदैव’, असे महाडेश्वर म्हणाले. ‘मी सकाळापासून मुंबईत फिरतोय पण मला कुठेही पाणी तुंबलेले दिसले नाही. काही ठिकाणी पाणी थोडंसं साचलं होतं पण ते काढून टाकण्यात आलं’, असंही ते म्हणाले.महापालिकेचे  अधिकारी, कर्मचारी, नगरसेवक परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत असे त्यांनी सांगितले.