उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना अप्रत्यक्ष टोला

आवाज दणदणीत असूनही कोण दाबतंय

मुंबई: विरोधकांच्या संविधान बचाव रॅलीला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपानेही तिरंगा रॅली काढली होती. या रॅलीचा समारोप मुख्यमंत्र्यांच्या भाषणानं झाला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला होता. माझा आवाज बसला असला तरी भाजपाचा आवाज कोणी दाबू शकत नाही, कोणाच्यात इतकी ताकद नाही. विरोधकांची संविधान बचाव रॅली नाही, तर पक्ष बचाव रॅली आहे, असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. यावर बोलतांना उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना अप्रत्यक्ष टोला मारला.

आवाज दणदणीत असूनही कोण दाबतंय, असा टोला आज उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नाव न घेता लगावला आहे. मुंबईत सुरु झालेल्या महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या अधिवेशनात ते बोलत होते. काल सरकारनं आयोजित केलेल्या तिरंगा रॅलीदरम्यानच्या भाषणावेळी मुख्यमंत्र्यांचा घसा बसला होता. त्यावर नाव न घेता उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. मराठी वृत्तपत्रांचं काम मोठं आहे. मात्र हल्लीच्या काळात अपवाद वगळता विचार करणारे किती पत्रकार शिल्लक राहिले आहेत, अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली.

You might also like
Comments
Loading...