Share

Uddhav thackeray | निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरुद्ध उद्धव ठाकरेंची हायकोर्टात धाव

मुंबई : निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचा धनुष्यबाण गोठवला आहे. या निर्णयाविरुद्ध उद्धव ठाकरे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उच्च न्यायालयात उद्धव ठाकरे गटाकडून रिट याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेमध्ये निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात दाद मागण्यात आली आहे.

निवडणूक आयोगाने आमची बाजू मांडण्याची संधी दिली नाही – उद्धव ठाकरे 

निवडणूक आयोगाने आमची बाजू मांडण्याची संधी दिली नसल्याचा आरोप यामधून केला आहे. तसेच प्रतिज्ञापत्र आणि कागदपत्रांची पडताळणी न करता निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव गोठवण्याचा निर्णय घेतला, निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला तातडीने स्थगिती द्यावी, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे.

तातडीने सुनावणी होण्याची शक्यता –

या याचिकेची तातडीने सुनावणी घ्यावी, अशी मागणी देखील शिवसेनेच्या वकिलांकडून करण्यात आली आहे. त्यामुळे यावर दिल्ली उच्च न्यायालय काय निकाल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

सर्वोच्च न्यायालया ऐवजी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली, यावरुन अनेकांना प्रश्न पडला होता. मात्र, केंद्रीय निवडणूक आयोग हे दिल्ली उच्च न्यायालयाच्या अखत्यारीत येतं, त्यामुळे शिवसेनेने हायकोर्ट याचिका दाखल केली आहे. उच्च न्यायालय निवडणूक आयोगाच्या निर्णय प्रक्रियेत हस्तक्षेप करणार का हे पाहाणं महत्वाचं राहिल.

शिवेनेकडून उगवता सूर्य, मशाल आणि त्रिशूळ असे तीन चिन्ह पक्षासाठी सादर करण्यात आले होते. मात्र, हे तिन्ही पर्याय निवडणूक आयोगाच्या यादीत नसल्याचं समोर आलं आहे. फ्रीज, सफरचंद, पेन ड्राईव्ह, डस्ट बिन यासारख्या १९७ मुक्त चिन्हांपैकी एकाची निवड ठाकरेंना करावी लागणार आहे. त्यामुळे यावरुन सुद्धा वाद रंगणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

मुंबई : निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचा धनुष्यबाण गोठवला आहे. या निर्णयाविरुद्ध उद्धव ठाकरे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उच्च …

पुढे वाचा

Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now