Uddhav Thackeray । मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना सोबत घेऊन बंड केलं. यानंतर राज्यातील पूर्ण राजकारण पलटून गेलं. आजवर कधी नव्हती इतकी अस्पष्टता शिवसेनेच्या भवितव्याबद्दल दिसते आहे. या अस्पष्टतेला कारण शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंच्या मनात सुरु असलेला गोंधळ असल्याचं बोललं जातंय. यानंतर शिवसेना खासदार आणि सामानाचे कार्यकारी संपादक संजय राऊतांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीवर राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. बंडादरम्यान शिंदे गटातील आमदार शहाजीबापू पाटील हे त्यांच्या एका विधानाने चर्चेत आले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीत यावर भाष्य केलं.
या मुलाखतीमध्ये बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले कि, झाडी, डोंगार, हाटील महाराष्ट्रात नाही का? किती सुंदर आहे महाराष्ट्र. ग्रामीण भागातल्या आमदारांना महाराष्ट्राच्या या निसर्गाची भुरळ पडत नाही आणि गुवाहाटीच्या निसर्गाची भुरळ पडते. मला एक कळलंच नाही की मग तुम्ही महाराष्ट्राच्या मातीत जन्माला तरी कसे आलात? ज्या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलात त्या मातीची तुम्हाला ओढ नाही, प्रेम नाही. त्या मातीचं वैभव दिसलं नाही, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
दरम्यान, शिंदे गट आणि शिवसेना यांच्यात पक्ष चिन्हासाठी सध्या प्रबळ दावे केले जात आहेत. पक्ष चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने शिवसेना आणि शिंदे गटाला पुरावे सादर करण्याचे निर्देश दिले आहे. याबाबत उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, आपला कायद्यावर विश्वास आहे. सत्याचा विजय होईल. जे काही सुरु आहे ते दुर्दैवी आहे. माझा अजूनही देशाच्या घटनेवर भरवसा आहे, कायद्यावर भरवसा आहे. आम्हाला पुरावे द्यायची गरज नाही. लोक म्हणतात निवडणुक येऊ द्या. यांनाच पुरून टाकतो. जनताच यांना राजकारणातून पुरून टाकेल, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
महत्वाच्या बातम्या :
- Uddhav Thackeray : आम्हाला पुरावे द्यायची गरज नाही, शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत उद्धव ठाकरे म्हणाले…
- Shinde Government : शिंदे-फडणवीस सरकार धावतंय जोरात, २४ दिवसांत काढले तब्बल ५३८ जीआर
- विद्यार्थिनीला ओरडल्यामुळे शिक्षिकेला निर्वस्त्र करून बेदम मारहाण; पश्चिम बंगालमधील धक्कादायक घटना
- Ajit Pawar : शिंदे – फडणवीसांच्या हातात जास्त काही नाही, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अजित पवार म्हणाले…
- Deepak Kesarkar | युवा सेना प्रमुख आता फिरायला लागले, या आधी ते कधीच दिसत नव्हते – दीपक केसरकर
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<