उद्धव ठाकरेंचा पत्रकार परीषेदेतून काढता पाय !

उद्धव ठाकरे

मुंबई: पालघर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजप-शिवसेनेने एकमेकांवर आरोप केले होते. त्यामुळे दोन्ही पक्षात राजकीय तणाव वाढला आहे. दरम्यान शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर शेलक्या शब्दात टीका केली.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांना पत्रकारांनी तुम्ही सत्तेत आहात, सत्ता सोडण्यासंदर्भात प्रश्न विचारला असता उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परीषेदेतून काढता पाय घेतला.

तसेच उद्धव ठाकरे यांनी भाजपवर शेलक्या शब्दात टीका केली. वनगा परिवाराला न्याय देण्यासाठी शिवसेनेने निवडणूक लढवली. तसेच भाजपला आता मित्रांची गरज नाही. महाराष्ट्रात येऊन योगिंनी शिवरायांचा अपमान केला. आणि ज्यांच्यासाठी केला तोच उमेदवार विजयी झाला. असेही ते म्हणाले.