‘उद्धव ठाकरेंचा आदेश अंतिम, राजकारणात काहीही घडू शकते’; शिंदेंचा सूचक वक्तव्य

eknath shinde

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान यावेळी उद्धव ठाकरे यांनी असं काही वक्तव्य केलं की ज्यामुळे शिवसेना – भाजपची पुन्हा युती होणार असल्याची जोरदार चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे. केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे हे मंचावर असताना त्यांच्याकडे पाहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्याच्या संदर्भात वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगत आहेत.

मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात व्यासपीठावरच्या उपस्थित मान्यवरांना संबोधताना आजी-माजी सहकारी असा उल्लेख केला आहे. व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे आजी, माजी आणि एकत्र आले तर भावी सहकारी असे म्हणतांना त्यांनी मागे वळून पहिले. या वक्तव्यानेच भविष्यात पुन्हा एकदा सेना-भाजप युती होणार का? असे संकेत मुख्यमंत्री ठाकरेंनी दिले आहेत. यावरून आता राजकीय क्षेत्रातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

दरम्यान यावर आता शिवसेनेचे प्रमुख नेते व नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आता सूचक वक्तव्य केले आहे. ‘ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आमचे पक्षप्रमुख आहेत. त्यामुळे आम्ही त्यांच्याच आदेशाने आम्ही काम करत असतो. उद्धव ठाकरेंचा आदेश हा आमच्यासाठी अंतिम आहे. तसेच राजकारणामध्ये काहीही घडू शकते म्हणून युती संदर्भात निर्णय घेण्याचा सर्वस्वी अधिकार त्यांचाच आहे.’ असे सूचक वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या