उद्धव ठाकरेंचं मोदींना पत्र ; एमडी आणि एमएसच्या परीक्षा पुढे ढकलण्याची केली विनंती

doctor

मुंबई : जगात कोरोनाने रुग्ण वाढत आहे. तर देशात देखील आता कोरोनाची संख्या वाढत आहे. याचा खूप मोठा ताण हा आरोग्य व्यवस्थेवर आला आहे. सध्या अंतिम वर्षाचे निवासी डॉक्टर हे राज्य सरकार आणि महापालिका मेडिकल कॉलेजमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय व्यवस्थेला मदत करत आहेत.

दरम्यान, अंतिम वर्षाचे निवासी डॉक्टर हे सध्या महत्त्वाची भूमिका निभावत असून त्यांच्या एमडी आणि एमएसची परीक्षा डिसेंबर २०२० पर्यंत पुढे ढकलली जावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रातून केली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने ट्विटरवर हे पत्र शेअर केलं आहे. उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना परीक्षा पुढे ढकलण्यासाठी मध्यस्थी करत भारतीय मेडिकल काऊन्सिलला आदेश द्यावेत अशी विनंती केली आहे.

“अंतिम वर्षाचे निवासी डॉक्टर करोना महामारीशी लढा देण्यास महत्त्वाची भूमिका निभावत असून एमडी/एमएसच्या परीक्षा डिसेंबर २०२० पर्यंत पुढे ढकलण्यासंबंधी आपण मध्यस्थी करत भारतीय मेडिकल काऊन्सिलला आदेश द्यावेत,” अशी विनंती ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.

उद्धव ठाकरे यांनी पत्रातून सुपर स्पेशलिटी (डीएम/एमसीएच) यांची प्रवेश परीक्षाही डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. “परीक्षा द्यावी लागणारे अंतिम वर्षाचे निवासी डॉक्टर सध्या राज्य सरकार आणि महापालिका मेडिकल कॉलेजमध्ये करोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय व्यवस्थेला मदत करत आहेत. जर वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा पार पडली तर या कठीण काळात प्रशिक्षित डॉक्टरांची मोठ्या प्रमाणात कमतरता भासेल,” अशी भीती उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

मी शिवसैनिकाला पंतप्रधान बनवणारच – उद्धव ठाकरे

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसोबत बैठक, केले ‘हे’ महत्वाचे आवाहन

प्रशासन व लोकप्रतिनिधींना समन्वयाने काम करण्याचा अजित पवार यांचा आदेश