‘मी येथे आल्याने अनेकांच्या पोटात दुखत आहे’, उद्धव ठाकरेंचा ‘जय गुजरात’चा नारा

टीम महाराष्ट्र देशा : भाजपध्यक्ष अमित शाह आपला उमेदवारी अर्ज गांधीनगर मधून दाखल करणार असून त्यासाठी महाराष्ट्रातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हजेरी लावली आहे. यावेळी अमित शहा यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अमित शाह यांच्या रोड शोला सुरुवात करण्यात आली.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी आमच्यात मतभेद होते पण आता आमची मने जुळली आहेत. मी येथे आल्याने अनेकांच्या पोटात दुखत आहे, असा टोला लगावला आहे. आमच्यातली भांडणे पाहून काहींना आनंद झाला होता. आम्ही जनतेचे प्रश्न घेऊन भांडत होतो. पण आता आमच्यातले वाद संपले आहेत. कारण आमचे विचार सारखे आहेत. हिंदुत्व हा आमचा श्वास आहे. आम्हाला खुर्चीची ओढ नाही. २५ वर्षे आम्ही सत्तेशिवाय एकत्र होतो. एक भगवा घेऊन आम्ही वाटचाल केली. दिल्लीवर भगवा फडकावण्याचे आमचे स्वप्न होतं. ते २५ वर्षांनी पूर्ण झाले. अस देखील उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

Loading...

तर, नेहमी गुजरात विरोधी भूमिका घेणारे उद्धव ठाकरे यांनी भाषणाच्या शेवटी जय गुजरात असा नारा दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
अरे तुम्ही काय संरक्षण काढता, पवारांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रातील पैलवान सरसावले
धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
अजित पवारांचे मेहुणे अमरसिंह पाटील यांचं निधन
जातीवाद रोखण्यासाठी शरद पवार मैदानात; सरकार उचलणार 'हे' पाऊल
'उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री; महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे'
राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांची गुंडगिरी, 'इंडियन ऑईल'च्या अधिकाऱ्यांना केली हाणामारी
#शिवभोजन : ज्यांची ऐपत आहे त्यांनी 'शिवभोजन' घेऊ नये : अजित पवार
मराठा क्रांती मोर्चाचा पहिला बळी ' मी ' ठरलो : आमदार भारत भालके
अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश