उद्धव ठाकरे सरकारने मराठा आरक्षण लढ्यातील हुतात्म्यांच्या तोंडाला पाने पुसली – विनायक मेटे

टीम महाराष्ट्र देशा : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यभरात शिस्तबद्धरीत्या ५८ मूकमोर्चे काढण्यात आले होते. आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना राज्यभरात ४२ मराठा बांधवांनी आरक्षणासाठी हुतात्मे पत्करले होते. या सर्वांच्या वारसांना १० लक्ष रुपये मदत व त्यांच्या कुटुंबातील वारसाला शासकीय सेवेत घेण्याचे लेखी आश्वासन दिले गेले होते. बीड जिल्ह्यातील १० युवकांनी मराठा आरक्षण मिळावे याकरिता आपल्या जीवनाचा प्रवास संपवला असून आत्मबलिदान दिलेल्या तरुणांच्या वारसांना १० लक्ष रुपये व कुटुंबातील एका सदस्याला शासकीय सेवेत घेण्याचे लेखी आश्वासन दिले गेले होते. घटनेच्या २ वर्षानंतर केवळ ७ कुटुंबांना ५ लक्ष रु. मुख्यंमत्री सहायता निधीतून दिली गेली होती. मात्र उर्वरित ३ कुटुंबांना कसलाही निधी दिला गेलाच नाही.

मराठा आरक्षण आत्मबलिदानकर्त्यांच्या कुटुंबातील सदस्याला शासकीय सेवा व मदत निधीबाबत विचारणा करणारा तारांकित प्रश्न आ विनायक मेटे यांनी केल्यानंतर उत्तरादाखल मुख्यमंत्री ठाकरे यांनी शासन स्तरावर असे कसलेही लेखी आश्वासन दिले गेले नसल्याचे दिसून येत असल्याचे सांगितले. ‘मराठा आरक्षण लढ्यातील हुतात्म्यांच्या तोंडाला पाने पुसले असल्याचा आरोप आ मेटे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे.

Loading...

बीड जिल्ह्यातील १० तरुणांनी मराठा आरक्षण प्राप्तीसाठी आपले बलिदान दिले होते. यावेळी शासनाने सदर कुटुंबियांना लेखी आश्वासन देत १० लक्ष रु. निधी व कुटुंबातील एका सदस्यास शासकीय सेवेत घेण्याचे आश्वासन दिले होते. याबाबतीत बीड जिल्ह्यात आ विनायक मेटे यांनी आवाज उठवल्यानंतर २ वर्षांनी १० पैकी ७ कुटुंबांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लक्ष रुपये निधी देण्यात आला होता. मात्र सदर कुटुंबांना उर्वरित मदत निधी व शासकीय सेवेच्या बाबतीत कसलाही प्रतिसाद मिळाला नाही तर ३ कुटूंबांना कसलीच मदत मिळाली नसल्याबाबत विधानपरिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या उत्तरादाखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी असे आश्वासन दिले गेले नसल्याचे दिसून येत असल्याचे सांगितले आहे.

बीड जिल्ह्यातील आत्मबलिदान दिलेल्या तरुणांच्या वारसांकडे जिल्हा प्रशासनाचे उपविभागीय अधिकारी यांनी लेखी स्वरूपात १० लक्ष रुपये निधी व कुटुंबातील एका सदस्यास शासकीय सेवेत घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी याकडे दुर्लक्ष करत बलिदानकर्त्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. सर्व बलिदानकर्त्यांच्या नातेवाईकांकडे प्रशासनाने दिलेले लेखी पत्र आहे. याबाबतीत सातत्याने मराठा क्रांती मोर्चा, विविध संघटना, शिवसंग्राम व मराठा समाज मागणी करत आलेला आहे कि शासनाने आश्वासनाची पूर्तता करावी असे असताना या लेखी आश्वासनाचाच विसर पडत असेल तर हे सरकार मराठा समाजावर अन्याय करत असल्याचे दिसून येते आहे.

हे दुर्दैवी असून मराठा समाजात याबाबतीत संताप व्यक्त केला जात आहे.विधिमंडळात हा प्रश्न आपण लावून धरत या मराठा आरक्षण हुतात्म्यांना न्याय मिळवून देणार असल्याचे शिवसंग्रामचे विनायक मेटे म्हणाले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
कोरोनामुळे उद्धव ठाकरे सरकारचे भवितव्य टांगणीला ; वाचा 'काय' आहे प्रकरण
धक्कादायक : निलंग्यातील मशीदमधून ताब्यात घेतलेल्या १२ परप्रांतीयांपैकी ८ जणांचा अहवाल पॉझीटीव्ह !
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
सोन्याच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे दर
माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....