आज बंद नाही पण उद्धव ठाकरेंचा दुटप्पीपणा दिसला – नारायण राणे 

टीम महाराष्ट्र देशा : मुंबईत बंदचा परिणाम दिसला नाही, पण उद्धव ठाकरेंची पुन्हा दुटप्पी भूमिका पाहायला मिळाली. शिवसेना पेट्रोल भाववाढीवर बोलते. एकीकडे महागाईवर बोलायचं पण दुसरीकडे सत्तेला चिटकून राहायचं, यामधलं सातत्य आज दिसलं आहे, असा टोला माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेला लगावला आहे.

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरवाढीविरोधात देशभरात आंदोलनं सुरु आहेत. त्यावर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते खासदार नारायण राणे यांनी मुंबईत भारत बंदचा परिणाम दिसला नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, शिवसेना नेहमीच कोलांट्याउड्या मारते. दुटप्पी भूमिका म्हणजे शिवसेना. महागाईसाठी जेवढी भाजप जबाबदार आहे तेवढीच शिवसेनाही जबाबदार आहे. कारण केंद्रात आणि राज्यात दोघेही सत्तेत आहेत. सत्तेत असताना विरोध करतात, मग आज बंदमध्ये सहभागी व्हायला पाहिजे होतं. पण तसं झालं नाही, याचं कारण सत्ता आहे, असं टीकास्त्र नारायण राणे यांनी सोडलं.