नवसाचं पोरचं जर उडाणटप्पू निघालं तर बोलायचं कुणाला? उद्धव ठाकरेंची सरकारवर टिका

कोल्हापूर: ‘हे सरकार म्हणजे नवसाचं पोर आहे. त्यामुळे नवसाचं पोर जर उडाणटप्पू निघालं तर बोलायचं कुणाला?’ ‘सरकारच्या धोरणामुळे जेरीस आलेल्या उद्योजकांनी आंदोलन छेडल्यास मी स्वतः त्याचं नेतृत्व करेल.’ अस आश्वासन देत उद्धव ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टिका केली.

उद्धव ठाकरे तीन दिवसीय पश्चिम महाराष्ट्रच्या दौऱ्यावर आहेत या दौऱ्यावेळी त्यांनी उद्योजकांशी संवाद साधला.

‘मी खूप काही तरी करतोय असा आभास निर्माण करायचा आणि त्यावर जाहिराती करुन भोळ्याभाबड्या जनतेला फसवायचं आणि पुढे आपलं चालू ठेवायचं ही सरकारची व्याख्या माझी नाही. ही लोकशाही मानायला मी तयार नाही.’ अस म्हणत सरकारच्या जाहिरातबाजीवर सुद्धा त्यांनी चांगलच तोंडसुख घेतलं.

पहा उद्धव ठाकरे यांचे संपूर्ण भाषण