Uddhav Thackeray । मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरील कारवाईमुळे शिवसेना चांगलीच अडचणीत आली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी मोठं वक्तव्य केले आहे. महाराष्ट्रात शिवसेना संपत आहे. आता केवळ भाजप राहणार, असे वक्तव्य नड्डा यांनी पाटणा येथे केले आहे. भाजपशी लढण्याची क्षमता अन्य कोणत्याही पक्षात नाही भाजपसोडून सर्व राजकीय पक्ष संपतील, असे नड्डा म्हणाले. यानंतर नड्डा यांच्या या विधानावर शिवसेना प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया देत पलटवार केला आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, सर्वच लोकांनी आता डोळे उघडून पाहायला पाहिजे. जिथे नेऊ इच्छितात तिथे नेऊ द्या. त्यात मदत करायची की नाही हे सामान्य नागरिकांनी ठरवायची वेळ आली आहे. भाजपसोबत लढणारा आज कोणताच राजकीय पक्ष नाही. नड्डांचे विधान हे देशाला हुकूमशाहीकडे नेणारे असून, ओडिसा, तेलंगणा, तामिळनाड महाराष्ट्रात शिवसेना ही संपण्याच्या मार्गावर असल्याचे म्हटले आहे. त्यांनी हा एकदा करून बघावं, असे आव्हान ठाकरे यांनी नड्डांना दिले आहे.
तसेच पुढे राष्ट्रवादी कुटुंबाचा पक्ष, काँग्रेस भाऊ बहिणाचा पक्ष असून भाजपला वंशवादाच्या विरोधात लढायचं आहे. या सगळ्यामध्ये भाजपचा वंश पहिले कुठून सुरू झाला हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण तेच म्हणतात की, इतर पक्षात काम केलेले लोक आपल्याकडे येत आहेत. मग जर इतर पक्षातील लोक त्यांच्याकडे येणार असतील तर, मग भाजपचा वंश तरी नेमका कोणता हे तपासणे महत्त्वाचे आहे, असं ठाकरे यावेळी म्हणाले.
दरम्यान, याआधी आता थोड्या वेळापूर्वी उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या परिवाराची भेट घेतली आहे. उद्धव ठाकरे हे संजय राऊत यांच्या भांडुप मधील निवासस्थानी आले होते. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्या आई आणूनि पत्नीची भेट घेतली. यावेळी त्यांनी राऊतांच्या कुटुंबियांना धीर दिला त्यांची विचारपूस केली. मात्र यावेळी त्यांनी माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती.
महत्वाच्या बातम्या :
- Aaditya Thackeray | दोन लोकांच्या जम्बो मंत्रिमंडळात मुख्यमंत्री कोण आणि उपमुख्यमंत्री कोण तेच समजत नाहीये – आदित्य ठाकरे
- Aaditya Thackeray : चाळीसच्या चाळीस आमदारांनी राजीनामा द्यावा, बघू सत्य जिंकते की सत्ता; आदित्य ठाकरेंचं पुन्हा आव्हान
- Vishwajeet Kadam | हुकुमशाही पद्धतीने केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर सुरु – विश्वजित कदम
- Eknath Shinde | “रोज सकाळी वाजणारा भोंगा बंद झाला” ; एकनाथ शिंदेंचा संजय राऊतांना टोला
- Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी घेतली संजय राऊतांच्या कुटुंबीयांची भेट
>>> TOP CATEGORIES - राजकारण । क्रीडा बातम्या । कृषी बातम्या । आरोग्य बातम्या | मनोरंजन बातम्या । नोकरी बातम्या । मुंबई बातम्या । पुणे बातम्या । औरंगाबाद बातम्या । नाशिक बातम्या। नागपूर बातम्या । व्हिडीओ बातम्या । Trending News <<<
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<