‘उद्धव ठाकरे तुम्ही आणि तुमच्या मुलाने राजीनामा द्यावा’

Nilesh Rane

सिंधुदुर्ग : राणे विरुद्ध ठाकरे यांच्यातील राजकीय वाद हा अनेक वर्षांचा आहे. भाजपा खासदार नारायण राणे यांच्यासह त्यांचे दोन्ही पुत्र आमदार नितेश राणे व माजी खासदार निलेश राणे हे देखील वारंवार उद्धव ठाकरेंसह शिवसेनेवर जहरी टीका करत असतात. दरम्यान, आता सुशांत सिंहच्या मृत्यूप्रकरणी ठाकरे सुपुत्र व मंत्री आदित्य ठाकरे यांचे देखील नाव आता जोडले जात आहे.

“अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणात सुप्रीम कोर्टाच्या रेकॉर्डवर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे नाव आले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिलाच पाहिजे” अशी मागणी माजी खासदार निलेश राणे यांनी केली आहे. “आदित्य ठाकरे यांचे नाव सुप्रीम कोर्टाच्या रेकॉर्डवर येणे, ही साधी गोष्ट नाही. बिहार सरकारच्या काऊन्सिलने नाव घेतले आणि सुप्रीम कोर्टाने ते नाव काढून टाकले नाही. आरोपी म्हणून यांचं नावही त्या रेकॉर्डवर गेलं आहे” असे निलेश राणे म्हणाले.

भाजपा खासदार-आमदारामध्येच एकमत नाही; पडळकरांनी केली संजय पाटलांवरच टीका

यावरून निलेश राणे यांनी ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे या पितापुत्रांच्या थेट राजीनाम्याचीच मागणी त्यांनी केली आहे. निलेश राणे यांनी, ‘ उद्धव ठाकरे तुमच्या मुलाचं नाव सुप्रीम कोर्टाच्या रेकॉर्ड मध्ये आले… की आदित्य ठाकरेचा सुशांत सिंग राजपूतच्या केस मध्ये सहभाग जाणवतो. तुम्हाला आणि तुमच्या मुलाला लवकरच राजीनामा द्यावा लागेल कारण ह्या केस मध्ये तुम्ही आणि तुमच्या मुलाने पदाचा दुरुपयोग केला आहे.’, अशी जहरी टीका ठाकरे पितापुत्रांवर केली आहे.

‘ऑपरेशन कमळ’ फसले; पुन्हा शिवसेनेचा सामनातून भाजपावर निशाणा

दरम्यान, काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांनी मौन सोडत एका पत्रकाद्वारे आपली बाजू मांडली होती.

हे तर गलिच्छ राजकारण पण मी संयम बाळगलाय!

‘कोरोना’ संकटाने देशभर हाहाकार माजवला आहे. महाराष्ट्राचे सरकार ‘कोरोना’चा पराभव करण्यासाठी शर्थ करीत आहे. बहुधा, महाराष्ट्र सरकारचे यश, लोकप्रियता ज्यांना खुपते त्यांनी सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचे घाणेरडे राजकारण सुरू केले आहे. सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी व्यक्तिशः माझ्यावर तसेच ठाकरे कुटुंबावर नाहक चिखलफेक करण्यात येत आहे. ही एक प्रकारे वैफल्यातून उमटलेली राजकीय पोटदुखीच आहे.मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा हा प्रकार माणुसकीला कलंकित करणारा आहे. मुळात या सर्व प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही.

यंदा दहीहंडी गोविंदांच्या थरांविनाच!

सिनेसृष्टी म्हणजे’ बॉलीवूड’ हे मुंबई शहराचे एक महत्त्वाचे अंग आहे. या उद्योगावर हजारोंचा रोजगार अवलंबून आहे. त्यापैकी अनेकांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध नक्कीच आहेत. हा काही गुन्हा नाही. सुशांतसिंग राजपूतचा मृत्यू दुर्दैवी तितकाच धक्कादायक आहे. मुंबईचे पोलीस या प्रकरणाचा खोलवर तपास करीत आहेत व महाराष्ट्राच्या पोलिसांना जागतिक प्रतिष्ठा आहे, पण ज्यांचा कायद्यावर विश्वास नाही तेच लोक याप्रकरणी फालतू आरोपांचा धुरळा उडवीत तपास भरकटवण्याचा प्रयत्न करीत आहेत.

मी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा नातू म्हणून सांगू इच्छितो, महाराष्ट्राच्या, शिवसेनेच्या व ठाकरे कुटुंबाच्या प्रतिष्ठेस तडा जाईल असे कृत्य माझ्या हातून कदापि होणार नाही. फालतू आरोप करणाऱ्यांनी हे समजून घेतले पाहिजे. या प्रकरणाची कुणाकडे काही विशेष माहिती असेल तर त्यांनी ती पोलिसांनाच द्यायला हवी. पोलीस नक्कीच त्या दिशेने तपास करतील. याप्रश्नी मी आजही संयमानेच वागत आहे. अशाप्रकारे चिखलफेकी करून सरकार व ठाकरे परिवारास बदनाम करता येईल या भ्रमात कोणी राहू नये.

तूर्त इतकेच !

आपला नम्र,

आदित्य उद्धव ठाकरे