‘उद्धव ठाकरेंना पंतप्रधान झालेलं बघायला आवडेल’

blank

टीम महाराष्ट्र देशा : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री नव्हे तर पंतप्रधान झालेलंही बघायला आवडेल, असे वक्तव्य जलसंपदा मंत्री तानाजी सावंत यांनी केले आहे. तानाजी सावंत पिंपरी चिंचवडमधील भूम पारंडा येथील रहिवासी मेळाव्यात बोलत होते.

आगामी विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे. दरम्यान राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार? या प्रश्नावरून भाजप आणि शिवसेनेतील राजकारण तापलेले दिसत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढचा मुख्यमंत्रीही मीच होणार असे वक्तव्य केले. तसेच भाजपचे अनेक नेते देखील पुढचा मुख्यमंत्री भाजपचाचं होणार असे वक्तव्य करत आहे. इतकेच नव्हे तर शिवसेनेकडून पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाचं होणार असे वक्तव्य करण्यात येत आहे. तर शिवसेनकडून युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार असतील असे वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले होते. मात्र अद्यापही पुढचा मुख्यमंत्री कोणाचा होणार याचे उत्तर गुलदस्त्यातच आहे.

याचदरम्यान उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री नव्हेतर पंतप्रधान झालेलंही बघायला आवडेल असे वक्तव्य करत जलसंपदा मंत्री तानाजी सावंत यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. इतकेच नव्हे तर सत्तेचा माज उतरवण्याची ताकद शिवबंधनात आहे असेही त्यांनी म्हंटले.