अमरावती शिवसेनेत यादवी, मातोश्रीवर बोलावली महत्वाची बैठक

टीम महाराष्ट्र देशा- अमरावतीमध्ये शिवसेनेचे उमेदवार आनंद अडसूळ यांचा पराभव झाला होता आता या पराभवाचे साईड इफेक्ट दिसू लागले आहे. माजी खासदार अनंत गुढे यांना आज मातोश्रीवर बोलवण्यात आल्याची चर्चा असल्यानं अडसूळ गट नाराज झाला आहे.

अडसूळ यांच्या पराभवानंतर मंथन करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर आज अमरावतीच्या पदाधिकारी आणि शिवसैनिकांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत अमरावतीचा वाद मिटणार की वाढणार हे लवकरच समोर येईल.

दरम्यान, अडसूळ गट अत्यंत आक्रमक झाला असून पराभवाचे खापर गुढे यांच्यावर फोडू लागला आहे. गुढे यांच्या पत्नीने खासदार नवनीत राणा यांचा सत्कार करून दिलेल्या शुभेच्छांचा व्हिडिओ आणि फोटो उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहेत.