अाता पुण्याकडे अधिक लक्ष देणार : उद्धव ठाकरे

पुणे : गेले काही वर्ष पुण्याकडे दुर्लक्ष झाले हाेते. परंतु अाता मी पुण्याकडे अधिक लक्ष देणार असून मला पुण्यात वारंवार यायला अावडेल असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले.उद्धव ठाकरे अाज पुणे दाैऱ्यावर अाहेत. दुपारी ते पत्रकारांशी बाेलत हाेते.

दरम्यान,लोकसभेसाठी शिरुरमधून शिवसेनेतर्फे चौथ्यांदा खासदार आढळरावच उमेदवार असणार हे आता निश्चित झाले आहे. शिरुर लोकसभा मतदार संघाचे शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव यांचे काम कौतुकास्पद असल्याचं सांगत आढळराव यांच्या उमेदवारीला अनुकुलता दर्शविली आहे. पुण्यात शिवसेनेला मरगळ अाली नसून शिवसेनेत काेणीही लेचेपेचे नसल्याचेही त्यांनी अावर्जून सांगितले.

पंकज! ‘भुजबळ’ साहेबांच्या तब्येतीची काळजी घे- उद्धव ठाकरे

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील पदाधिका-यांशी संवाद साधण्यासाठी उध्दव ठाकरे आज (शनिवारी) पुणे दौ-यावर आहेत. पुणे जिल्हा, ग्रामीणअंतर्गत येणा-या लोकसभा, विधानसभा मतदार संघानिहाय ते आढावा घेत आहेत. सकाळी शिरुर लोकसभा मतदार संघाचा आढावा घेण्यात आला.

शिवसेनेचे सत्तेत राहणे नुकसानीचेच- आढळराव पाटील

शिरुर मतदार संघातून शिवसेनेचे उमेदवार खासदार शिवाजीराव आढळराव हेच असणार आहेत, हे आता निश्चित झाले आहे. आढळराव चौथ्यांदा लोकसभा लढविणार आहेत. त्यामुळे आता भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोण उमेदवार असेल, याची उत्स्कूता शिरुर मतदार संघातील राजकीय वर्तुळातील नागरिकांना लागली आहे.

मतदान केंद्रावरच राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या समर्थकांमध्ये जुंपली