मुंबई : राज्यात सद्या शिवसेना विरुद्ध मनसे असं जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर टीका केली होती. उद्धव ठाकरेंनी आपल्या कालच्या सभेतून राज ठाकरे यांचा खरपूस समाचार घेतला. उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांचा उल्लेख मुन्नाभाई असा केला आणि राज ठाकरे यांच्या डोक्यात केमिकल लोच्या झाला आहे, असे म्हटले होते. आता उद्धव ठाकरे यांच्या या टीकेनंतर मनसेकडून प्रत्युत्तर आले आहे. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.
लगे रहो मुन्ना भाई चित्रपटात महात्मा गांधींचे विचार एकूण त्यातला नायक त्यांचे विचार आत्मसात करतो. त्याप्रमाणे राज ठाकरे हे लहानपणापासून बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत राहिले आहेत. राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आत्मसात केल आहेत. उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आत्मसात करण्याची गरज आहे, अशी टीका अमेय खोपकर यांनी केली. उद्धव ठाकरे यांना लगो रहो मुन्ना भाई हा चित्रपट बहुधा समजला नसावा, तो त्यांनी नीट समजून घ्यावा.
उद्धव ठाकरे यांना आपण लगे रहो मुन्ना भाई या चित्रपटचं डीव्हीडी पाठवणार असल्याचे खोपकर यांनी सांगितले. उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आत्मसात करण्याची गरज आहे. लगो रहो मुन्ना भाई हा चित्रपट बहुधा समजला नसावा, तो त्यांनी नीट समजून घ्यावा, असेही खोपकर म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या :