सामना व्यंगचित्र प्रकरण: उध्दव ठाकरे पुसद न्यायालयात होणार हजर

uddhav thackeray

संदेश कान्हु, (जिल्हा प्रतिनिधी) यवतमाळ– मराठा समाजाच्या शिस्तबध्द मुकमोर्चासंदर्भाने दिनांक २५/०९/२०१६ रोजी सामना या वृत्तपत्रामध्ये व्यंगचित्राच्यामाध्यमातून मराठा समाजाच्या भावना दुखावतील असे व्यंगचित्र प्रकाशित केले होते. या घटनेचा निषेध सर्व स्तरावरुन करण्यात आला होता. मात्र पुसद येथील एका विधिज्ञने दाखल केलेल्या तक्ररी वरुण उध्दव ठाकरे यांना यवतमाळ जिल्ह्यातील पुसद न्यायालयात हजर राहण्याची पाळी आली आहे.

Loading...

समनातील व्यंगचित्राच्या माध्यमातून मराठा क्रांती मूक मोर्चा हा मराठ्यांच्या विविध मागण्यासाठी नसून, तो मराठा स्त्री पुरुषाने एकमेकांचा मुका घेण्यासाठीच मोर्चा केला आहे असे दर्शविले आहे, त्या व्यंगचित्रामुळे मराठा समाजाच्या भावना दुखावल्याची फिर्याद अॅड. दत्ता सूर्यवंशी,यांनी दिनांक २७/०९/२०१६ रोजी, पुसद येथील न्यायालयात दाखल केली होती. अॅड . आशिष देशमूख सह ३० वकिलांनी सदर प्रकरणात फिर्यादी तर्फे वकीलपत्र दाखल केले आहे, त्या फिर्यादीची दखल घेत , पुसद येथिल प्रथमश्रेणी न्यायाधिश ए. एच . बाजड यांनी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे ‘ संजय राऊत ‘ राजेंद्र भागवत आणि श्रीनिवास प्रभू देसाई यांना संमन्स जारी केला आहे. ..Loading…


Loading…

Loading...