मी शांत, संयमी… याचा अर्थ नामर्द नाही; मुख्यमंत्र्यांचा भाजपला इशारा

udddhav thackeray

मुंबई- महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं ‘सामना’चे कार्यकारी संपादक, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेतली आहे. राज्य सरकारच्या वर्षभराच्या कामाचा आढावा घेतानाच मुख्यमंत्री ठाकरे यांनी राजकीय प्रश्नांनाही उत्तरं दिली आहेत.

‘मी शांत आहे, संयमी आहे. पण याचा अर्थ मी काही नामर्द नाही. हिंदुत्ववादी म्हटल्यावर एक संस्कृती आहे. तुम्ही कुटुंबियांवर येणार असाल, मुलाबाळांवर येणार असाल तर आमच्या अंगावर येणाऱ्यांना ज्यांना ज्यांना कुटुंब आणि मुलंबाळं आहेत, त्यांना मी सांगू इच्छितो की, तुम्हालाही कुटुंब आणि मुलंबाळं आहेत. तुम्ही धुतले तांदूळ नाहीत. तुमची खिचडी कशी शिजवायची ती आम्ही शिजवू शकतो,’ असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपला दिला.

संपूर्ण देशात केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत आहे. आपण त्यामुळं सीबीआयला वेसण घातली. दुरुपयोग व्हायला लागल्यावर अशी वेसण घालावीच लागते. ईडी, सीबीआय वर राज्याचा अधिकार नाही का? आम्ही नावं देतो, आमच्याकडे नावं आहेत. मालमसाला तयार आहे. पण सुडाने जायचं का? मग जनतेने आपल्याकडून काय अपेक्षा ठेवायच्या. सुडानेच वागायचं असेल तर तुम्ही एक सूड काढा आम्ही दहा सूड काढू, असाही इशारा उद्धव ठाकरेंनी दिला.

महत्वाच्या बातम्या