उद्धव ठाकरेंनी घेतले सहकुटुंब विठुरायाचे दर्शन

टीम महाराष्ट्र देशा- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज पंढरपूरच्या दौऱ्यावर आहेत. काही वेळापूर्वीच ठाकरे पंढरपुरात पोहोचले. अयोध्या दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे यांचा हा महत्वाचा दौरा मानला जात आहे. उद्धव ठाकरे सहकुटुंब पंढरपुरात दाखल झाले आहेत. आदित्य, रश्मी ठाकरेंसह उद्धव ठाकरे यांनी विठुरायाचे दर्शन घेतले. काही वेळातच त्यांची जाहीर सभा होणार आहे.

अयोध्येमध्ये श्रीराम मंदिर उभारणी करता जनजागृतीसाठी उद्धव ठाकरे सोमवारी महासभा घेऊन चंद्रभागा नदीची महाआरती करणार आहेत. धर्मसभेच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत असलेल्या शिवसेनेने राज्य परिवहन महामंडळाच्या मालकीच्या मैदानाची निवड केली आहे. तब्बल 27 एकरावर हे मैदान पसरले असून, सुमारे 5 लाख शिवसैनिक आणि भाविक या धर्मसभेला उपस्थित राहणार असल्याचा अंदाज आहे.

1 Comment

Click here to post a comment