Uddhav Thackeray | मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटबंदीची घोषणा केली होती. या नोटबंदी काल सहा वर्षे पुर्ण झाली. एका सभेमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी नोटबंदी बाबत वक्तव्य केलं होतं. अशातच शिवसेना उद्धव बाळासाहेबव ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देखील सामना (Saamana) आग्रलेखातून नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर निशाणा साधत नोटबंदी मागील सत्य सांगितलं आहे.
नोटाबंदीनंतरच्या सहा वर्षांत देशाची अर्थव्यवस्था असो की चलनव्यवस्था, यात नेमका बदल काय झाला? नोटाबंदीमुळे ना सरकारच्या अपेक्षेप्रमाणे काळा पैसा नष्ट झाला ना बनावट नोटांचा सुळसुळाट पूर्ण थांबला. डिजिटल, कॅशलेस व्यवहार यात मोठी वाढ झाली, पण रोख व्यवहारांचे प्रमाण मागील पानावरून पुढे तसेच सुरू असल्याचं सांनामध्ये म्हटलं आहे.
जनतेकडील रोख रकमेतही तब्बल 72 टक्के वाढ झाली आहे. मग नोटाबंदीनंतर आपली अर्थव्यवस्था घडली की बिघडली? चलनव्यवस्था सुधारली की पुन्हा पूर्वीच्याच वळणावर गेली? आज सहा वर्षांनंतरही या आणि अशा इतर प्रश्नांची नेमकी उत्तरे मिळू शकत नाहीत. नोटाबंदीचे ‘सत्य’ हेच समजायचे का?, असं सामना आग्रलेखात म्हटलं आहे.
दरम्यान, रिझर्व्ह बँकेच्याच माहितीनुसार बनावट नोटांचे प्रमाण 10.7 टक्क्यांनी वाढले आहे. त्यातील 500 रुपयांच्या नकली नोटा 101.93 टक्के, तर 2000 रुपयांच्या नकली नोटा 54 टक्के एवढ्या प्रमाणात वाढल्या आहेत. 2016 मध्ये जेव्हा नोटाबंदी झाली तेव्हा प्रामुख्याने 500 आणि 1000 रुपयांच्या बनावट नोटांचा प्रश्न गंभीर होताच, पण आता 10, 20 आणि 200 रुपयांच्याही बनावट नोटांचा सुळसुळाट देशात झाला आहे. म्हणजे नोटाबंदीपूर्वी मोठया रकमेचे बनावट चलन देशाची अर्थव्यवस्था पोखरत होते. आता 10, 20 आणि 200 रुपयांच्याही बनावट नोटा हे उद्योग करीत आहेत, असं देखील सामनातून उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Eknath Shinde | “आता त्यांना आनंद साजरा करु द्या, आम्ही…”, शिंदे गटाचा राऊतांवर निशाणा
- Supriya Sule | अजित पवार राष्ट्रवादीत नाराज असल्याच्या चर्चांवर सुप्रिया सुळेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या…
- Sanjay Raut | “… अन् ठाकरेंचा उर भरुन आला”, जामीननंतर संजय राऊतांना उद्धव ठाकरेंचा फोन
- Sanjay Raut | “माझ्या अटकेचे आदेश…”, संजय राऊतांचा गौप्यस्फोट
- Aravind Sawant | “झुकले ते मिंध्ये, संजय राऊत खऱ्या अर्थानं जिंदे”; अरविंद सावंतांची प्रतिक्रिया