Share

Uddhav Thackeray | “स्वातंत्र्यवीरांच्या बाबतीत राहुल गांधींच्या मनात ठासून भरलेला तिरस्कार…”, ठाकरे गटाने घेतला समाचार

Uddhav Thackeray | मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) गटाने काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना पुन्हा एकदा सुनावलं आहे. याबाबत त्यांनी सामना आग्रलेखात अनेक बाबी लिहिल्या आहेत. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यानंतर राजकीय तापलं आहे.

गेल्या आठ वर्षांपासून केंद्रात भाजपचे सरकार आहे, पण वीर सावरकरांना ‘भारतरत्न’ देण्याची मागणी शिवसेना करीत असताना हे लोक बहिऱ्याची भूमिका वठवतात. यास ढोंग नाही म्हणायचे तर काय? वीर सावरकरांचा सन्मान होईल असे एकही काम फडणवीस मोदी यांनी केले नाही. राहुल गांधी यांनी सावरकरांच्या माफीचा विषय – काढताच भाजपवाल्यांचे निषेधाचे नागोबा बिळातून बाहेर पडतात व फूत्कार सोडतात, पण ही संधी या नागोबांना राहुल गांधी वारंवार का देतात, हाच संशोधनाचा विषय आहे! महाराष्ट्र वीर सावरकरांना मानतो, आदर करतो. त्यांच्या शौर्याचा सन्मान करतो, करत राहील, असं सामनामध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, ब्रिटिश साम्राज्याचा पाया जेवढा महात्मा गांधींच्या अहिंसक चळवळीने हलवला, तेवढाच तो सावरकरांसारख्या क्रांतिकारकांच्या लढयामुळेही उखडला. महात्मा गांधींनाही त्याची कल्पना होती. पन्नास वर्षांची शिक्षा ठोठावताच “तोपर्यंत तुमची सत्ता राहील काय?” असा भेदक प्रश्न विचारून साखळदंडात जखडलेले सावरकर अंदमानकडे निघालेल्या बोटीत चढले. काय हा आत्मविश्वास! हे सर्व इतिहासात नोंदवले आहे, पण इतिहासाशी वैर अलीकडे सगळ्यांनीच घेतलेले दिसते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपचा स्वातंत्र्य लढय़ात काडीइतकाही संबंध नव्हता. तसा तो सावरकरांच्या विचारधारेशी नव्हता. सावरकरांच्या हिंदू महासभेवर तर या लोकांनी आगपाखड केली. त्यामुळे सावरकरांचे नाव घेऊन राजकारण करण्याचे उद्योग त्यांनी बंद करावेत, असा इशारा देखील ठाकरे गटाने दिला आहे.

दरम्यान, मिंधे गटाचे लोक तर राहुल गांधी समजून वीर सावरकरांनाच रस्त्यावर जोडे मारीत आहेत. असे हे अकलेचे शत्रू शिवसेनेला हिंदुत्व आणि सावरकरांचे विचार समजवायला निघाले आहेत. गेल्या आठ वर्षांपासून केंद्रात भाजपचे सरकार आहे, पण वीर सावरकरांना ‘भारतरत्न’ देण्याची मागणी शिवसेना करीत असताना हे लोक बहिरयाची भूमिका वठवतात. यास ढोंग नाही म्हणायचे तर काय? वीर सावरकरांचा सन्मान होईल असे एकही काम फडणवीस – मोदी यांनी केले नाही. राहुल गांधी यांनी सावरकरांच्या माफीचा विषय काढताच भाजपवाल्यांचे निषेधाचे नागोबा बिळातून बाहेर पडतात व फूत्कार सोडतात. पण ही संधी या नागोबांना राहुल गांधी वारंवार का देतात, हाच संशोधनाचा विषय आहे! राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा देशात पसरत चाललेल्या तिरस्कार व द्वेषाच्या राजकारणाविरोधात आहे, पण वीर सावरकरांसारख्या स्वातंत्र्यवीरांच्या बाबतीत राहुल गांधींच्या मनात ठासून भरलेला तिरस्कार आधी नष्ट व्हायला हवा, असं देखील ठाकरे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

Uddhav Thackeray | मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) गटाने काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now