‘शिवसेनच्या अंतर्गतवादावर कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे तोडगा काढतील’

udhav thackeray

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी कोल्हापूर शिवसेना पक्षात मतभेद आणि वाद असल्याचं उघडकीस आल होत. यावर शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ‘केवळ शिवसेनेत नाही, तर काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप अशा सर्वच पक्षांत अंतर्गत वाद आहेत. त्यामुळे सेनेतील अंतर्गत वादातून झालेल्या टीकेला आमदार राजेश क्षीरसागर उत्तर देण्यास समर्थ आहेत. पक्षांतर्गत वादावर कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे तोडगा काढतील,’ असे इंगवले म्हणाले.

इंगवले एका पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले की, ‘शिवसेनेतील अंतर्गत वादातून झालेली ही टीका असली तरी कोणत्या पक्षात वाद नाही? काँग्रेसमध्ये आमदार सतेज पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक, राष्ट्रवादीमध्ये आमदार हसन मुश्रीफ, माजी खासदार धनंजय महाडिक, भाजपमध्ये नवा-जुना असा अंतर्गत वाद आहे. तसाच वाद सेनेत आहे. मात्र, या वादातून झालेल्या टीकेला उत्तर देण्यास आमदार समर्थ आहेत.

दरम्यान ‘महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना सुखरून बाहेर काढण्यासाठी सरकारी यंत्रणांसह ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोलाची मदत केली. त्यामुळे राज्याचे कॅबीनेट मंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार व्यक्त करण्यासाठी शिवसेनेकडून पत्रकार परिषदेत आयोजित केली होती.