मुंबई : महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकारवर संकटाचे ढग दाटून आले आहेत. पक्षाचे दिग्गज नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे हे आसाममधील एका हॉटेलमध्ये एकूण ४० आमदारांसह उपस्थित आहेत आणि सरकार स्थापन करण्याच्या त्यांच्या आग्रहावर ठाम आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकरे यांनी एकतर भाजपसोबत सरकार बनवावे किंवा स्वत:कडे लक्ष द्यावे, असे एकनाथ शिंदे यांचे म्हणणे आहे. अशा स्थितीत ठाकरेंनी त्यांच्या अट मान्य न केल्याची चर्चा आहे. त्यामुळे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पदाचा राजीनामा देणार असल्याची जोरदार चर्चा आहे. याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महत्वाचे ट्वीट केले आहे.
महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ होत असताना उद्धव ठाकरे विधानसभा बरखास्त करू शकतात, असे संकेत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिले आहेत. त्यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे, “महाराष्ट्रातील राजकीय खळबळ विधानसभा बरखास्त करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.” त्याचवेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावली आहे. त्यामुळे चर्चांना उधान आले आहे.
यापूर्वी, बुधवारी सकाळी बोलतांना राऊत म्हणाले होते, “जास्तीत जास्त करून सत्ता जाईल, पण पक्षाच्या प्रतिष्ठेशी तडजोड करणार नाही. शिंदे यांनी कोणतीही अट घातली नाही. पक्षाच्या उभारणीत त्यांचे योगदान आहे. आम्ही सतत संपर्कात असून सर्व आमदार शिवसेनेतच राहणार आहेत. ऑपरेशन लोटस यशस्वी होणार नाही.”
सायंकाळपर्यंत आणखी १० आमदार उद्धव ठाकरेंविरोधात बंड करून शिंदे गटात सामील होऊ शकतात, असा दावा सूत्रांनी केला आहे. तसे झाल्यास बंडखोर आमदारांची संख्या ५० होऊ शकते. त्याचवेळी महाराष्ट्रात सरकार संकटात सापडल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसही सावध झाली आहे. काँग्रेस नेते कमलनाथ मुंबईत आमदारांशी चर्चा करणार आहेत, तर शरद पवारही मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन भविष्याची रणनीती ठरवणार आहेत.
महत्वाच्या बातम्या :
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<