उद्या शरद पवार घेणार उद्धव ठाकरेंची भेट, सत्ता वाटपाबाबत पुन्हा खलबतं

blank

टीम महाराष्ट्र देशा : राज्याला पर्यायी सरकार देण्यासाठी गेल्या दोन दिवसापासून सुरु असलेली राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या नेत्यांची दिल्लीतील बैठक संपली. ज्यात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये विविध विषयांवर दोन्ही पक्षाचे एकमत झाले आहे. तसेच अंतिम निर्णय शिवसेनेशी चर्चा केल्यानंतर घेतला जाईल असे कॉंग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या दिल्लीतील बैठकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उद्या मुंबईत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या भेटीत ते सत्ता वाटपाच्या फोर्म्युल्याबद्दल चर्चा करू शकतात. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या अंतिम निर्णयाने ते शनिवारी राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावादेखील करू शकतात अशी शक्यता आहे.

दरम्यान, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं महाविकासआघाडीचं सरकार दृष्टीक्षेपात असताना आता कोणाला कोणं खातं मिळणार याची चर्चा रंगू लागली आहे. महाविकासआघाडीचा संभाव्य फॉर्म्युलानुसार संभाव्य मंत्रीमंडळात एकूण ४२ मंत्री असू शकतात. त्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येक १५ मंत्री असतील तर काँग्रेसला १२ मंत्रीपदं मिळतील. प्रत्येक चार आमदारांमागे एक मंत्री अशाप्रकारे मंत्रीपदांचं वाटप करण्यात येणार आहे. ४२ पैकी उरलेली ३ मंत्रीपदांचं तिन्ही पक्षांमध्ये वाटप होईल.

महत्त्वाच्या बातम्या :