fbpx

उद्धव ठाकरे अमित शहांचा अर्ज भरण्यास गुजरातला जाणार…

टीम महाराष्ट्र देशा : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अमित शाहांच्या लोकसभा उमेदवारीचा अर्ज दाखल करण्यास उपस्थित राहणार आहेत. एकेकाळी अमित शाह यांची तुलना अफजलखानाशी करणारे उद्धव ठाकरे चक्क अमित शहा यांचा अर्ज भरण्यासाठी स्वतः गुजरातला जाणार आहे.

सध्या राज्यसभेचे खासदार असलेले अमित शहा यंदा पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याआधी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं जाणार आहे. त्यासाठी शहांनी उद्धव ठाकरेंना गुजरातला येण्याचं आमंत्रण दिलं आहे. उद्धव यांनी हे आमंत्रण स्वीकारलं. अर्ज दाखल करण्याआधी अमित शाह आपल्या मतदारसंघात रोड शो करुन शक्तीप्रदर्शन करणार आहेत.

२०१४ मध्ये शिवसेना भाजपची २५ वर्षांची युती तुटल्यानंतर उद्धव यांनी पुढील सर्व निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला. मात्र तरीही शिवसेना केंद्र आणि राज्यातील सरकारमध्ये कायम होती. तसेच तुळजापूरमध्ये झालेल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांची तुलना अफजल खानाच्या फौजेसोबत केली होती. अमित शहांनीही पटक देगें म्हणत शिवसेनेवर शरसंधान साधलं होतं.

दरम्यान, आगामी निवडणुकीसाठी अखेर दोन्ही पक्षांनी युती करण्याचा निर्णय घेतला. राज्यातील २५ जागा भाजपा, तर २३ जागा शिवसेना लढवेल. तर विधानसभेला निम्म्या म्हणजेच प्रत्येकी १४४ जागा लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

1 Comment

Click here to post a comment