उद्धव ठाकरेंनी मानले पंकजा मुंडेंचे आभार, राजकीय वर्तुळात चर्चांना उधान

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात अनेक दिवसाच्या सत्तासंघर्षानंतर महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. त्यामुळे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी उद्धव ठाकरे यांना अभिनंदनाचे ट्विट केले होते. या ट्विटला उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले आहे. मात्र उद्धव ठाकरेंच्या या ट्विटचा संदर्भ पंकजा मुंडे यांच्या ‘त्या’ फेसबुक पोस्टशी लावला जात आहे.

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या फेसबुक पोस्टमुळे राजकीय वर्तुळात चांगलीचं चर्चा माजली आहे. पंकजा मुंडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये पुढे काय करायचं ? कोणत्या मार्गाने जायचं? आपल्या लोकांना आपण काय देऊ शकतो? या सर्व बाबींचा सर्वांगाने विचार करून येत्या १२ डिसेंबरला आपल्यासमोर येणार आहे, असे लिहिले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात पंकजा मुंडे भाजपला रामराम ठोकून शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा रंगली आहे.त्यावर आता शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सूचक असे ट्विट केल्याने या चर्चाना आता आणखीनचं उधान येणार असल्याचे दिसत आहे.

दरम्यान शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनीही पंकजा मुंडे यांच्याबाबत सूचक विधान केले होते. पंकजा मुंडेच काय तर राज्यातील अनेक नेते शिवसेनेच्या वाटेवर असल्याची प्रतिक्रिया खा. संजय राऊत यांनी दिली आहे. पंकजा मुंडेंचा 12 तारखेलाच कळेलही असेही ते म्हणाले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात आता चर्चांना उधाण आले आहे.राऊत यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

महत्वाच्या बातम्या

Loading...