56 इंचाच्या छातीपेक्षा, छातीवर मेडल्स असणारी माणसे जास्त महत्वाची – उद्धव ठाकरे

udhav thakare

मुंबई :  अंडरवर्ल्डमध्ये प्रचंड दहशत असलेले पोलीस अधिकारी इसाक बागवान यांच्या ‘मी अगेन्स्ट द मुंबई अंडरवर्ल्ड’ या पुस्तकाचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं यावेळी भाजपवर टीकेची एकही संधी न सोडणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

‘अलीकडे देशात 56 इंचाच्या छातीची फार चर्चा आहे. पण 56 इंचाच्या छातीपेक्षा त्या छातीवर किती मेडल्स आहेत त्याला महत्त्व आहे.असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मी इथे आलोय ते इसाकभाई आणि पोलिस दलाला मानाचा मुजरा करण्यासाठी आपल्या कर्तव्यासाठी जे आपल्या प्राणांची आहुती द्यायलाही मागे पुढे पाहत नाहीत ते खरे हिरो. त्यांनी देशासाठी दिलेल्या योगदानावर सिनेमा यायला हवा,’ अशी भावना उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमाला बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी, शिवसेनेचे खासदार संजय राऊत उपस्थित होते. बागवानबद्दल बोलताना संजय राऊत म्हणाले की, ‘आतापर्यंत बारामतीचे बागवान आणि शरद पवार या दोनच व्यक्ती दिल्लीमध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत. 56 इंचाची छाती म्हणजे नक्की काय हे बागवान यांच्याकडे पाहून मिळते. भुजबळ विरोधी पक्षनेते झाले तेव्हा शिवसैनिकांनी त्यांच्या बंगल्यावर हल्ला चढवला होता. त्यावेळी बागवान आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा हल्ला रोखला. ते जर तिकडे नसते तर आज इतिहास काही वेगळाच असता.

पक्ष कसा चालवायचा ते मी शिवसेनाप्रमुखांकडून शिकलो, इतरांनी धडे देण्याची गरज नाही

शिवसेना खासदार संजय राऊत घेणार मुख्यमंत्र्यांची मुलाखत