मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दादरच्या शिवाजी पार्कवर दसरा मेळावा पार पडला. यावेळी शिवाजी पार्कवर बोलताना उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी बोलताना त्यांनी तुफान फटकेबाजी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी आपल्या हिंदुत्वाबाबत प्रखर भूमिका मांडली. तसेच भाजप आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांवर देखील जोरदार टीका केली.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले कि, माणसाची हाव किती असते? इतरांना बाजूला सारून तुला आमदार केलं मंत्री केलं, आता मुख्यमंत्री झाला. पण तरी शिवसेनाप्रमुख व्हायचंय यांना. शिवसेनाप्रमुख म्हणून त्याला स्वीकारणार का तुम्ही? आहे का लायकी त्याची? एकतर स्वत:च्या वडिलांच्या नावाने मतं मागण्याची हिंमत नाही. बाप चोरणारी औलाद. स्वत:च्या वडिलांचा तरी विचार करायचा. त्यांना वाटेल काय हे दिवटं कार्ट माझ्या पोटी जन्माला आलं जे माझ्याऐवजी दुसऱ्याच्या बापाचं नाव लावतंय, असं म्हणत घणाघाती टीका केली.
तसेच पुढे ठाकरे म्हणाले कि, यांना गद्दारच म्हणणार. मंत्रीपदं तुमच्या बुडाला चिकटलेली असली, तरी ती काही काळापुरती आहेत. पण कपाळावरचा गद्दारीचा शिक्का या जन्मीतरी पुसला जाणार नाही. तेव्हा अनेकांना प्रश्न पडला की आता शिवसेनेचं काय होणार? माझ्या मनात चिंता नव्हती. आज हे शिवतीर्थ बघितल्यावर त्यांच्या मनात पुन्हा प्रश्न पडला की अरे बापरे, गद्दारांचं कसं होणार? इथे एकही माणूस भाड्याने आणलेला नाही. तासाची बोली लावून आणलेला नाही, असं ठाकरे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Eknath Shinde | “कटप्पा स्वाभिमानी होता, तुमच्यासारखा दुटप्पी नव्हता” ; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
- Eknath Shinde | एकनाथ शिंदेंचे भाषण सुरू असताना अर्ध्याहून अधिक लोक निघून गेले
- Uddhav Thackeray । महागाईच्या वेदना तुम्हाला जाणवू नयेत, म्हणून हिंदुत्वाचा डोस; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
- Eknath Shinde | एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंचा घेतला खरपूस समाचार! भाषणातील महत्वाचे मुद्दे वाचा…
- Eknath Shinde | “तुम्ही तर बापालाच विकण्याचा प्रयत्न केला…” ; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार