मुंबई : शिवसेना आणि शिंदे गट यांच्यातील संघर्ष सध्या न्यायालयात गेला आहे. दोन्ही बाजूंनी खरी शिवसेना हि आमचीच आहे, असं वारंवार ठणकावून सांगण्यात येत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आज दुपारी २ वाजता शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी लाईव्ह येत पत्रकारांशी संवाद साधला. तसेच त्यांनी अनेक मुद्द्यावर भाष्य केलं. तसेच त्यांनी शिंदे गटातील आमदारांवर देखील निशाणा साधलाय.
पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले कि, माझ्या मुलांना आयुष्यातून उठवण्यापर्यंत ज्यांचे प्रयत्न चालले, त्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसला आहात, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांचा चांगलाच समाचार घेतला. तसेच मातोश्रीवर सन्मानाने बोलावलं, असे बोलणाऱ्यांना मातोश्री, आदित्य, उद्धव यांच्याबाबत प्रेम आहे, याबद्दल धन्यवाद, असं उद्धव ठाकरे म्हणाले. पण हे जे प्रेम दाखवता, तेच प्रेम दोन अडीच वर्ष कुठे होतं, असा सवालही त्यांनी यावेळी विचारला.
दरम्यान, कायद्यानुसार शिवसेनेचं चिन्ह धनुष्यबाण हा कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. त्यामुळं याबाबत शिवसैनिकांनी मनात कोणताही संभ्रम ठेऊ नये. मी घटनातज्ज्ञांशी बोलून तुम्हाला सांगतो आहे. चिन्हाबाबतची चिंता सोडा. लोक धनुष्यबाणचं नव्हे तर उमेदवारही पाहतात. समजा की कधीकाळी एखादा आमदार पक्ष सोडून गेला म्हणजे पक्ष संपतो का? सगळे आमदार जरी गेले, तरी पक्ष संपू शकत नाही. आमदार जाऊ शकतात, पक्ष जाऊ शकत नाही, असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<