‘समान नागरी कायद्या’वर उद्धव ठाकरेंनी अग्रलेख लिहावा : ओवेसी

टीम महाराष्ट्र देशा : देशात मोदी सरकारने आपल्या दुसऱ्या कार्यकाळात कलम 370 चा प्रश्न निकाली काढला आहे. त्यानंतर आता मोदी सरकार समान नागरी कायदा अमलात आणणार असल्याचं बोललं जात आहे. यावर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात भाष्य केले होते. तोच धागा पकडत एमआयएमचे नेते अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

जर ‘समान नागरी कायदा’ म्हणजे काय हे जर ठाकरेंना काळत असेल तर त्यांनी आपल्या सामना या वृत्तपत्रात समान नागरी कायद्याचे फायदे कोणते यावर अग्रलेख लिहावा, असे ओवेसी म्हणाले आहेत. नांदेडमध्ये काल एमआयएमच्या प्रचारासाठी ओवेसींची सभा पार पडली. यावेळी खासदार असदुद्दीन ओवीसी यांनी उद्धव ठाकरेंना चिमटा काढला.

उद्धव ठाकरे यांचं भाषण ऐकलं. ते भाजप अध्यक्षांना म्हणाले, आता समान नागरी कायदा लागू करा. बरं ठीक आहे. समान नागरी कायदा म्हणजे काय, त्याचे फायदे काय यावर उद्धव ठाकरेंनी सामनात अग्रलेख लिहून दाखवावा. तुम्हाला जे समजलं, नाही समजलं, तुमचं वृत्तपत्र आहे, असे म्हणत ओवेसी यांनी ठाकरे यांना टोला लगावला.

महत्वाच्या बातम्या