Share

Devendra Fadanvis | उद्धव ठाकरेंनी आपले शब्द मागे घ्यावेत, जाहीर माफी मागावी-देवेंद्र फडणवीस

अकोला : अकोला येथे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री आणि अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरेंसारख्या नेत्याने एकनाथ शिंदेंच्या नातवाचा उल्लेख करुन टिप्पणी करणे अतिशय खालच्या दर्जाचं असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की,उद्धव ठाकरेंनी आपले शब्द परत घेतले पाहिजे. एकनाथ शिंदे यांच्याशी तुमचं पटत नाही, पण काही पथ्य पाळली पाहिजेत. तसेच, नातू नगरसेवकपदावर डोळा लावून बसला आहे. एवढा दीड वर्षांचा बच्चू आहे, रुद्रांश. त्याचा जन्म झाला आणि तुमचं अध:पतन सुरू झालं. तुम्ही मुख्यमंत्री झालात, तुमचा मुलगा मंत्री झाला, आम्ही काही बोललो का?, असा सवाल करत  देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर चांगलाच पलटवार केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत ट्विट करून उद्धव ठाकरे यांनी जाहीरपणे आपले शब्द मागे घेण्याची मागणी केली आहे. “ठाकरे यांच्यासारख्या नेत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दीड वर्षांच्या नातवाचे नाव घ्यावे, हे अतिशय दुर्दैवी आहे. महाराष्ट्र कुठे चालला आहे, याचे चिंतन केले पाहिजे. खरं तर त्यांनी जाहीरपणे आपले शब्द मागे घेतले पाहिजे”, अशा आशयाचं ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या नातवावर टीका केल्यानंतर शिंदे गटाकडून जोरदार टीका केली आहे. त्यात आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत उद्धव ठाकरे काय उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

दरम्यान, काय कमी दिलं त्यांना? बाप मंत्री आता तर मुख्यमंत्री आहे, कार्टं खासदार. पुन्हा डोळे लावून बसले आहेत, नातू नगरसेवक. अरे त्याला मोठं तर होऊ दे, शाळेत जाऊ दे. आताच नगरसेवक?, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात भाषण करताना केलं होतं.

महत्वाच्या बातम्या :

अकोला : अकोला येथे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री आणि अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. देवेंद्र …

पुढे वाचा

Maharashtra Politics

Join WhatsApp

Join Now