fbpx

इंटरनेट सोबत रेशन आणि पेट्रोलही मोफत द्या – उद्धव ठाकरे

Uddhav_Thackray

टीम महाराष्ट्र देशा : जियो फायबर आता केबल नेट व्यवसायात शिरकाव करणार आहे. यामुळे केबल चालकांच्या व्यवसावर परिणाम होणार असल्याने केबल चालकांनी शिवसेनेकडे धाव घेतली होती. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केबलचालकांसोबत आज बैठक घेतली. त्यात बोलताना डिजीटल इंडियाने पोट भरणार नाही असं म्हणत इंटरनेट सेवेबरोबर दैनंदिन वस्तूही मोफत द्या अशी खोचक मागणी त्यांनी सरकारला केली आहे. त्याचबरोबर त्यांनी शिवसेनेचा केबल चालकांना पाठिंबा असल्याचंही जाहीर केलं.

फायबर केबलच्या माध्यमातून रिलायन्स केबल सेवा मोफत देत असल्याने केबलचालकांवर बेकारीची वेळ येणार आहे. दरम्यान या विषयावर बोलत असतना उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही चांगलेच बरसले.

नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे ?

“ही मोफत सेवा म्हणजे एक सापळा आहे. यात माणूस फसत जातो आणि नंतर या सेवेची सवय लागल्यानंतर पैसे वाढवले जातात. जर इंटरनेट मोफत देत असाल तर रेशन आणि पेट्रोलही मोफत द्या. फुकट इंटरनेटमुळे पोट भरत नसून हे डिजिटल इंडिया काही उपयोगाचे नसल्याचे ”