सरकारमधून बाहेर पडायचं की राहायचं, हे आम्हाला कुणी शिकवू नये- उद्धव ठाकरे

udhav thakare vardhapan din

मुंबईः एकीकडे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे भाजप सोबत युती तोडण्याची घोषणा करतात. दुसरीकडे भाजपासोबतच सत्तेत राहण्याचे संकेत देतात. त्यामुळे शिवसेनेची परिस्थिती तळ्यात कि मळ्यात अशी झाली आहे. आज सरकारमधून बाहेर पडायचं की सोबत राहायचं, हे आम्हाला कुणी शिकवू नये. अशे उद्धव ठाकरेंनी खडसावले.

उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंकडून आम्ही राजकारणाचं बाळकडू घेतलंय. त्यामुळे सरकारमधून बाहेर पडायचं की सोबत राहायचं, हे आम्हाला कुणी शिकवू नये. तडजोडीचं राजकारण केलं तर बाळासाहेब मला माफ करणार नाहीत.आणि मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या महाराष्ट्रव्यापी शिबिरामध्ये उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केलं.

दरम्यान, पुण्यातील कार्यक्रमात पेशवेकालीन पगडीने स्वागताची परंपरा आहे. मात्र शरद पवारांनी त्याला फाटा देत, यापुढे राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात फुले पगडीनेच स्वागत करावे असं म्हंटलं होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत असून शरद पवार यांच्यावर टीका देखील केली जात आहे.आता याच मुद्द्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पवारांवर निशाणा साधला आहे.राजकारण करायचं असल्यास डोकी वापरा, दैवतांच्या पगड्या वापरु नका असं म्हणत ठाकरे यांनी पवार यांच्यावर टीका केली आहे.