उद्धव ठाकरेंनी तीन वर्षे देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रिपद द्यावे; रामदास आठवलेंचा ठाकरेंना सल्ला

पुणे:- महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार फार काळ टिकणार नाही. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपबरोबर यावे. त्यांनी एक वर्ष आणि उर्वरित तीन वर्षे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपद द्यावे, अशी सूचना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जाऊन सत्ता स्थापन केली असल्याने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आणण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्यासाठी पुढे आले पाहिजे. तसेच पुण्यासह राज्यातील अन्य पाच महापालिकांच्या निवडणुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) आणि भाजप एकत्र लढविणार आहोत, असेही आठवले यांनी सांगितले आहे.

शेतकऱ्यांचे आंदोलन चुकीचे आहे. दबाव आणून कायदे मागे घ्यायला लावणे योग्य नाही. शरद पवार यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची माहिती असल्याने शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याऐवजी त्यांनी कायद्यात बदल सुचवायला हवा, असे आठवले यांनी नमूद केले आहे.

महत्वाच्या बातम्या