शरद पवार पुन्हा उद्धव ठाकरेंच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधान

sharad pawar udhav thakre

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला वर्ष बंगल्यावर पोहचले आहेत. या आठवड्यात ही दुसरी भेट आहे. विरोधी पक्षातील नेत्यांच्या राज्यपालांच्या दारी वाढलेल्या चकरा आणि राज्यातील कोरोनामुळे उद्भवलेली बिकट परिस्थिती यामुळे या भेटीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

लॉकडाऊनचा चौथा टप्पा ३१ मेरोजी संपत असताना केंद्र सरकारने लॉकडाऊनचा कालावधी वाढवला आहे. राज्यातही लॉकडाऊन वाढवला जाणार आहे, मात्र लॉकडाऊन वाढवता कोणत्या गोष्टींना शिथिलता द्यायची, याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होईल. तसंच कोरोना लॉकडाऊनमुळे राज्याचं अर्थचक्र कसे सुरु करायचं? याबाबतही चर्चा होणार असल्याचं समजतंय.

दिलासादायक : मुंबईत रुग्णवाढ दुप्पट होण्याचा सरासरी कालावधी १३ वरुन आता १६ दिवसांवर

आठवड्यातली मुख्यमंत्री आणि पवार यांच्यातली ही दुसरी भेट आहे. सोमवारी शरद पवार यांनी मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना भेटून शरद पवार मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले, त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलं होतं. पण उद्धव ठाकरे सरकार स्थिर असल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलं होतं.

पोलिस आणि कुटुंबीयांसाठी बेपत्ता असलेल्या एका युवकाने विलगीकरण केंद्रात केले ‘हे’ कृत्य